तरुण भारत

सांगली : भिशीतून महिलांना लाखोंचा गंडा

50 हून अधिक महिलांचे पोलिसांकडे अर्ज, बहिणीस ठकवल्याप्रकरणी पोलीस कोठडी
जाधव विरुद्ध एमपीआयडी अंतर्गत कारवाई होणार

प्रतिनिधी / इस्लामपूर

Advertisements

बहिणीस 13 तोळे दागिन्यास ठकवणाऱया लोणार गल्लीतील मारुती अरुण जाधवने भिशीच्या नावाखाली 50 ते 55 कष्टकरी महिलांना 55 ते 60 लाख रुपयांना फसवले आहे. गुरुवारी या महिलांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात अर्ज दिले. याप्रकरणी जाधववर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. बहिणीस फसवल्या प्रकरणात न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

जाधवने सावकारीतून त्रास होत असल्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करुन आत्महत्येचा ड्रामा केला होता. बुधवारी त्याची बहीण अनिता संजय देशमाने (32,रा. कोरोची, ता. हातकणंगले, सध्या रा. इस्लामपूर) यांनी भावाने 13 तोळे दागिने घेवून फसवणूक केल्याची फिर्याद दिली. सध्या पती सासरी येवू देत नसल्याने त्या माहेरी आईकडे राहतात. गुन्हा दाखल होताच इस्लामपूर पोलिसांनी त्याला अटक केली.

जाधव लोणारगल्ली परिसरात भिशी चालवत होता. यामध्ये कष्टकरी महिलांनी आर्थिक गुंतवणूक केली होती. त्यातील काही महिलांना त्याने लाखोंचा गंडा घातला आहे. मुद्दल व व्याज न दिल्याने महिलांनी पाठपुरावा केला. पण त्याने दाद दिली नाही. सामान्य कुटुंबातील असल्याने त्या तक्रारीसाठी पुढे आल्या नव्हत्या. मात्र बहिणीनेच मारुतीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर गुरुवारी 50 ते 55 महिला पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे, निरीक्षक नारायण देशमुख यांना भेटल्या. त्यांनी कैफियत मांडून मारुतीच्या कृत्याची माहिती दिली.

पोलिसांनी या महिलांचे लेखी अर्ज घेतले आहेत. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.अर्जांची पडताळणी करुन रात्री उशिरापर्यंत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे निरीक्षक देशमुख यांनी सांगितले. याशिवाय अन्य प्रकारचे गुन्हेही दाखल होण्याची शक्यता आहे.

एमपीआयडी अंतर्गत गुन्हा

याबाबत पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले, जाधवने महिलांची आर्थिक फसवणूक केली आहे. प्राथमिक दर्शनी 55 ते 60 लाख रुपयांना गंडा घातल्याचे पुढे येत आहे. एका माजी सैनिकांशी करार पत्राने सात लाख रुपये घेतल्याचे पुढे येत आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदार †िहतसंबंध संरक्षण अधिनियम 1999 कलम 1 अन्वये गुन्हा नोंद करण्यात येईल. बहिणीला फसवल्याच्या गुन्हÎातील पोलीस कोठडी संपताच जाधवला या गुन्हÎात वर्ग करण्यात येईल.

Related Stories

बेडगमध्ये तळ्यात आढळला महिलेचा मृतदेह

triratna

शिराळा येथे नागपंचमी उत्सवात इतरांना प्रवेश नाही

triratna

दंडोबा डोंगरावर, पाच एकरातील हजारो झाडे जळून खाक

triratna

भाजपा सोशल मीडिया तर्फे प्रशिक्षण शिबिर

triratna

सांगली : हरिपूर पर्यटकांचे नवे आकर्षण

triratna

बनावट नोटा बनवणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

triratna
error: Content is protected !!