तरुण भारत

निवडणूक लढविण्यास अनेकजण इच्छुक

नव्या पुनर्रचनेचा इच्छुकांनी केल्या अभ्यास

बेळगाव/ प्रतिनिधी

Advertisements

बेळगाव महापालिका वॉर्ड पुनर्रचना 2018 मध्ये झाली होती. मात्र सदर पुनर्रचना चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे नव्या वॉर्ड पुनर्रचनेनुसार निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याचे निदर्शनास आले आहे.

नव्या वॉर्ड पुनर्रचनेनुसार मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. काही इच्छुक उमेदवारांनी नव्या वॉर्ड पुनर्रचनेचा अभ्यास केला असून, मतदार याद्या घेण्यासाठी मनपा कार्यालयात धाव घेतली आहे. यापूर्वी शहराच्या दक्षिण भागातून वॉर्डची सुरूवात होत होती. मात्र नव्या वॉर्ड पुनर्रचनेनुसार शहराच्या मध्यवर्ती भागातून वॉर्ड क्र. 1 ची सुरूवात होते. शहराच्या मध्यवर्ती भागातच बारा वॉर्ड असून, उर्वरित वॉर्डची व्याप्ती शहराच्या सभोवती पसरत गेली आहे. काही माजी नगरसेवकांनी कोणत्या वॉर्डमधुन निवडणूक लढवायची याचा पूर्ण अभ्यास करून कामाला लागले आहेत. त्यामुळे मतदार यादी घेण्यासाठी महापालिकेत गर्दी होत आहे. बुधवारी दुपारी निवडणुकीची घोषणा होताच गुरूवारी सकाळपासून महापालिका कार्यालयात इच्छुकांची गर्दी वाढली आहे. शुक्रवारी सकाळी देखील  असंख्य नागरिकांनी मतदार यादीसाठी महापालिका कार्यालयातील कौन्सिल विभागात गर्दी केली होती. मतदार यादी घेण्यासाठी नवख्या उमेदवारांसह माजी नगरसेवकांचा देखील सहभाग मोठय़ा प्रमाणात होता. तर यावेळी कोणता उमेदवार कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी अर्ज भरणार याबाबतच्या चर्चा सुरू होत्या. काही वॉर्डमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असल्याचे समजते. उमेदवारी अर्ज आणि मतदार यादी घेण्यासाठी सर्वांनीच महापालिकेत धाव घेतली होती.

Related Stories

शहरातील बीएसएनएलचा मोठा टॉवर हटविण्यास सुरुवात

Amit Kulkarni

प्रजासत्ताक दिनासाठी झेंडय़ांची विक्री

Patil_p

उंदरासाठी लावलेल्या सापळय़ात अडकले घुबड

Patil_p

सरकारी अधिकारी-कर्मचाऱयांनी बीपीएल कार्डे तात्काळ परत करावीत

Patil_p

ओएमआरद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेची माहिती

Patil_p

मुलांना पुस्तके वाचण्याची सवय लावा

Patil_p
error: Content is protected !!