तरुण भारत

सांगली : उद्यापासून हॉटेल, दुकाने, मॉल, जिम दहापर्यंत सुरु

सिनेमागृहे, धार्मिक स्थळे बंदच, जिल्हा प्रशासनाकडून कोरोना नियमात शिथीलता

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

ब्रेक द चेनअंतर्गत लॉकडाऊन नियमांत स्वातंत्र्यदिनापासून शिथिलता मिळणार असून दुकाने, मॉल, उपहारगृहे, जिम, योग सेंटर, सलून-स्पा, रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु धार्मिकस्थळे, सिनेमागृहे बंदच राहणार आहेत.

शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार आहे, त्याचबरोबर त्यासाठीच्या अटींचेही पालन करावे लागणार आहे, असे ते म्हणाले.

डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, हॉटेल्सला या सवलती दिल्या असल्या तरीही सोशल डिस्टन्सचे पालन करणे बंधनकारक आहे. ग्राहकांकडून शेवटची ऑर्डर नऊ वाजेपर्यंतच घ्यावी. पार्सल सेवा मात्र सुरु ठेवता येईल. कर्मचाऱ्यांचे लसीकरणही बंधनकारक आहे. ज्या आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण झाले असेल त्यांना मात्र शंभर टक्के क्षमतेने कामकाज सुरू करण्यास परवानगी आहे. तथापि गर्दी टाळावी लागेल. खुली मैदाने, लॉन किंवा मंगल कार्यालयातील विवाह सोहळे आसन क्षमतेच्या 50 टक्क्याने सुरू ठेवता येतील. नियम पालनाची खातरजमा करण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱयाला तपासणीसाठी उपलब्ध करून देणे बंदानकारक आहे. निर्बंधाचे उल्लंघन केल्यास संबंधित संस्थेचा परवाना रद्द करण्यात येईल, असे ते म्हणाले.

राजकीय, धार्मिक, कार्यक्रम बंदच

गर्दी टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार, सभा, रॅली, मोर्चे यावरील निर्बंध कायम आहेत. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांनी करावी. आदेश भंग करणाऱ्यांविरुद्ध साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याचे अधिकार संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.

Related Stories

सांगली शहरातील पती-पत्नी ओमिक्रॉनने बाधित

Sumit Tambekar

काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याच्या व्यथा…..!

Abhijeet Shinde

सांगली जिल्हय़ात विक्रमी 998 पॉझिटिव्ह, 32 बळी

Abhijeet Shinde

”मराठा आरक्षण रद्द याला सर्वस्वी महाविकास आघाडी जबाबदार”

Abhijeet Shinde

परजिल्ह्यातून, परराज्यातून आटपाडीत आलेल्या 11 लोकांवर गुन्हा

Abhijeet Shinde

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेचे योगदान महत्वपूर्ण – गृहमंत्री

Abhijeet Shinde
error: Content is protected !!