तरुण भारत

अॅन्टिमायक्रोबियल कोटिंगवर एसटी करणार ५५ लाखांचा खर्च

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाचा उपाय
फवारणीनंतर कोरोना होणार `छुमंतर’, 6 महिन्यांची ठेकेदार कंपनीची गॅरंटी

प्रवीण जाधव / रत्नागिरी

Advertisements

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून गाड्यांमध्ये ऍन्टीमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येणार आहे त्यानुसार बसमध्ये केमिकलची फवारणी करण्यात येणार आहे. त्यानंतर बसमध्ये 6 महिन्यांपर्यत कोरोनाचा विषाणू टिकणार नसल्याचा दावा ठेकेदार कंपनीकडून करण्यात आला आह़े रत्नागिरी विभागातील 469 बस गाड्यांसाठी सुमारे 55 लाख रूपयांचा खर्च होणार आहे. या कोटिंगच्या परिणामकारकतेबाबत मात्र प्रश्नचिन्ह असून अनेकांनी याबाबत साशंकता व्यक्त केली आहे.

एसटीच्या बसचे ऍन्टीमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून घेण्यात आला आह़े  यासाठी 2 कंपन्यांना कंत्राट देण्यात येणार आह़े रत्नागिरीतील बसचे केमिकल कोटींग करणाऱया कंपनीकडून कोटिंग केलेल्या भागावर 6 महिने कोरोना टिकणार नाही, असे सांगण्यात आल़े मात्र कोणत्या आधारे कंपनीकडून हा दावा करण्यात आला आहे, या बाबत खुलासा होवू शकलेला नाह़ी दरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडून देखील 6 महिने कारोनापासून संरक्षण देणाऱया फवारणीची पुष्टी केलेली नाह़ी  त्यामुळे कोरोनाच्या नावाखाली ही निव्वळ उधळपट्टी आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़े

वर्षातून दोनवेळा बसचे केमिकल कोटिंग करण्यात येणार आह़े 6 महिन्यांच्या अंतराने पुन्हा एकदा बसचे केमिकल कोटिंग करणे अत्यावश्क आह़े यासाठी एका बसला सुमारे 8 हजार 992 रुपये खर्च येणार आह़े रत्नागिरी विभागात एसटीच्या 469 बस असून त्यांच्यावर एकूण 55 लाख रूपये खर्च होणार आह़े राज्यभरात या केमिकल कोटिंगच्या नावाखाली कोटÎवधी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. तोटÎात चालणाऱया एसटी बसवर एवढÎा मोठÎा प्रमाणावर करण्यात येणाऱया खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आह़े

प्रवासी वाहतूक करताना प्रवासी बसमध्ये अनेक ठिकाणी स्पर्श करतात़ यामुळे साथरोग तसेच कोरोनाचे विषाणू पसरण्याचा धोका असत़ो मात्र बसमध्ये एकदा हे केमिकल कोटिंग केल्यावर त्या ठिकाणी 6 महिने कोरोनाचा विषाणू टिकणार नसल्याचा दावा करण्यात येत आह़े त्यानुसार एसटी बसमधील सर्व सीट, हॅन्ड रेस्ट, गार्ड रेल, खिडक्या, रेलिंग, ड्रायव्हर केबिन, फ्लोअरींग, रबर ग्लेझिंग, दरवाजा आदी भागांवर फवारणी करून केमिकल कोटिंग करण्यात येणार असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटीच्या फेऱया बंद राहिल्याने एसटी महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला होत़ा सद्यस्थितीतही पूर्ण क्षमेतेने एसटीची वाहतूक सुरु झालेली नाह़ी याचा फटका एसटीला बसतच आह़े कोकणात भक्तीभावाने साजरा करण्यात येणाऱया गणेशोत्सवात एसटीला चांगले  उत्पन्न प्राप्त होत असत़े याच गोष्टीचा विचार करून एसटीकडून सुरक्षित प्रवासाची हमी देण्यासाठी केमिकल कोटिंगचा घाट घालण्यात येत आह़े

 चौकट

जिह्यातील 469 बसचे होणार केमिकल कोटिंग  

जिह्यातील एकूण 469 बसना ऍन्टीमायक्राबियल कमिकल कोटिंग करण्यात येणार आह़े केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय राज्यस्तरावर घेण्यात आला आह़े त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल़ ज्या गाडÎांचे केमिकल कोटिंग करण्यात आले आहे, त्यांना स्टिकर लावण्याची व्यवस्था करण्यात येणार आह़े

              सुनील भोकरे (विभागीय वाहतूक नियंत्रक रत्नागिरी)

सहा महिने सुरक्षा कवच मिळण्याचा दावा हास्यास्पद

एकदा फवारणी केल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत सुरक्षा कवच प्राप्त होईल, हा संबंधित कंपनीचा दावा हास्यास्पद आह़े आम्ही रूग्णालयात दररोज 2 वेळा फवारणी करतो. तरीही कोरोना प्रादुर्भाव रोखणे कठीण होत आहे, अशी प्रतिक्रिया रत्नागिरीमधील वैद्यकीय व्यावसायिकाने दिली आह़े हे संशोधन मान्यताप्राप्त आहे अथवा कसे, या बाबत माहिती घेण्याची गरज आहे. असा पर्याय असेल तर तो शासन सर्वत्र का राबवत नाही, हा प्रश्नही उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

नाणार रिफायनरीला देवगडमधून विरोध मावळतोय

NIKHIL_N

गोव्यात नोकरीला जाणाऱया युवक-युवतींचा मार्ग मोकळा!

NIKHIL_N

रत्नागिरी : खेडमध्ये आठवड्यानंतर ३ कोरोनाचे रूग्ण

Abhijeet Shinde

रत्नागिरी जिल्ह्यातील दरडप्रवण गावांचे विशेष सर्वेक्षणात 45 गावांचा अभ्यास

Abhijeet Shinde

कोरोना योध्दा बालरोगतज्ञ डॉ.दिलीप मोरे यांचे निधन

Patil_p

कोरोना संक्रमणामुळे दोडामार्गात सॅनिटायझर फवारणीला सुरुवात

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!