तरुण भारत

“…या चर्चा जाहीरपणे सांगण्यासारख्या नाहीत”; मुख्यमंत्री ठाकरे आणि दरेकरांमध्ये बंद दाराआड चर्चा

मुंबई/प्रतिनिधी

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकरांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, राज्यात पूरपरिस्थितीमुळे मोठं नुकसान झालं आहे. दरेकर मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्तांसाठी मदतीचा चेक देण्यासाठी गेले होते. यावेळी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेल्या प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा सुरु होती. यामुळे दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, शुक्रवारी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दरेकर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना या चर्चा जाहीरपणे सांगू शकत नाही असं म्हटलं आहे. भेटीसंबंधी बोलताना ते म्हणाले की, ‘प्रामुख्याने महाराष्ट्रात आलेली पूरस्थिती आणि अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. त्याचबरोबर पूरग्रस्तांना मुंबईकरांकडून मदत जावी यासाठी मुंबईतील सहकारी संस्थांच्या वतीने आम्ही दीड कोटींचा निधी मुख्यमंत्री सहायत्ता निधीला दिला आहे. त्यामुळे मुंबई सहकारात काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं पूरग्रस्तांसाठी योगदान आहे हे निधीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं”.

Advertisements

Related Stories

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना गोव्यात प्रवेश

Abhijeet Shinde

सांगली : कोरोनाबाधितांवर सरसकट मोफत उपचार व्हावेत

Abhijeet Shinde

बसपाचे 6, भाजपचा एक आमदार सपामध्ये दाखल

datta jadhav

पतित पावन संघटनेतर्फे पूर्व भागात आरोग्य तपासणी शिबीर

Rohan_P

कोल्हापूर : ‘लाभांश’ला 31 मार्च 2021 उजाडणार!

Abhijeet Shinde

फलटण पालिका

Patil_p
error: Content is protected !!