तरुण भारत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट

दिल्ली :/प्रतिनिधी

महाराष्ट्रात १२ विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्तीवरून वाद सुरु आहे. शुक्रवारी कोर्टात याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने राज्यपालांना मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नसल्याची भूमिका मांडली आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन चर्चेत असणाऱ्या कोश्यारी यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत मंत्रिमंडळाने पाठवलेल्या शिफारशींच्या प्रस्तावावर अद्यापही निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे राज्यपाल आणि केंद्रीय गृह मंत्र्यांची भेट याच पार्श्वभूमीवरझाली असल्याचं बोललं जातं आहे.

कोश्यारी आणि शाह यांची भेट शुक्रवारी रात्री झाल्याची माहिती एएनआयने दिली आहे. मात्र या भेटीदरम्यान नक्की कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

Advertisements

Related Stories

सातारकरांना पुणेकरांची भिती

Patil_p

तावडे हॉटेल फाट्यावर वाहतुकीची शिस्त लावा

Abhijeet Shinde

इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांची तडकाफडकी बदली

Abhijeet Shinde

भारताला जगभरात नवीन ‘फार्मा हब’ म्हणून स्वीकृती

datta jadhav

समृद्ध आरोग्य यंत्रणा उभी करणे ही प्राथमिकता : राजेश टोपे

Rohan_P

घटनादुरूस्ती विधेयकात स्पष्टता नाही : विनायक राऊत

Rohan_P
error: Content is protected !!