तरुण भारत

सांगली : मिरज पश्चिम भागातील पूरग्रस्तांचा एल्गार; तात्काळ मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

तात्काळ मदत द्या अन्यथा आंदोलन

कसबे डिग्रज / वार्ताहर

Advertisements

मिरज पश्चिम भागातील नागरिकांचे महापुरात प्रचंड नुकसान झाल्याने शासकीय मदत मिळावी यासाठी कसबे डिग्रजमध्ये पूरग्रस्त गावातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मिरज पश्चिम पूरग्रस्त भागातील घरे, शेती, पशुधन, छोटे-मोठे व्यवसायांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत मिळावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला.

कसबे डिग्रज सोसायटीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत प्रामुख्याने शेतकऱ्यांना संपूर्ण पीककर्ज माफी, बिगर कर्जदारांना हेक्टरी दीड लाखाची मदत, पुरबाधित कुटुंबाना तात्काळ सानुग्रह मदत, वारंवार पुराचा धोका असणाऱ्या नागरीवस्तीचे पुनर्वसन, शेती आणि नळपाणी पुरवठा योजनांची नुकसान भरपाई, पूरपरिस्थितीत गावातुन बाहेर जाण्यासाठी किमान एक रस्ता करावा अशा अनेक मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री, पालकमंत्री महोदयांना देण्यात येणार आहे. पूरग्रस्तांच्या मागण्यांचा विचार करून न्याय न दिल्यास वेळप्रसंगी आंदोलन आणि उपोषण करण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी जेष्ठ नेते आनंदराव नलवडे, कवठे पिरान उपसरपंच भीमराव माने, सोसायटी चेअरमन रमेश काशीद, बाळासाहेब मासुले, बाबासाहेब आडमुठे, दुधगाव सरपंच विकास कदम, सावळवाडी सरपंच राजेंद्र उपाध्ये, उपसरपंच राहुल माणगावे, नितीन दणाणे, कुमार लोंढे, बंडू कागवाडे, उपसरपंच संदिप निकम, राजाराम चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

आटपाडीलगत विवाहितेचा गळा चिरला, दीड तासात आरोपी जेरबंद

Abhijeet Shinde

दोघे पॉझिटीव्ह तर चौघे कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

कामेरीत उसाला आग, सुमारे पन्नास एकर ऊस जळाला

Abhijeet Shinde

मिरजेत गोवा बनावटीची दारू जप्त

Abhijeet Shinde

सांगली :उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवथाळीचे वाटप

Abhijeet Shinde

सांगलीत सात पॉझिटिव्ह, धाकधूक वाढली

Abhijeet Shinde
error: Content is protected !!