तरुण भारत

युवा रक्तदाता संघटनेच्या दणक्यानंतर रक्तपेढीतील एसी यंत्रणा अखेर कार्यान्वित

 ओटवणे / प्रतिनिधी:

सावंतवाडी रक्तपेढीतील एसी, दरवाजा, खिडक्या आदी समस्या १४ ऑगस्टपूर्वी न सोडविल्यास १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना जाग्यावरून हलू न देण्याचा इशारा युवा रक्तदाता संघटनेने देताच रक्तपेढीतील नादुरुस्त एसी तात्काळ करून दरवाजा व खिडक्या बसवण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे रविवारी १५ ऑगस्ट रोजी बांधकामच्या अधिकाऱ्यां विरोधातील आंदोलन युवा रक्तदाता संघटनेने स्थगित केले आहे.   कोरोनामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग आणि वैद्यकीय प्रशासनाच्या कर्तव्यशून्य कारभारामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत दुरावस्था निर्माण झाली आहे. पर्यायाने रुग्णांच्या नातेवाईकांसह रक्तदात्यांना देखील नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. या रक्तपेढीत ४ वर्षांपूर्वी लावलेले एसी अवघ्या ३ महिन्यातच बंद पडले होते. तर ब्लड स्टोअर रूमचे दरवाजे, खिडक्या नादुरुस्त झाले. तसेच ‘ब्लड डोनेट’ रूमचा एक दरवाजा तर गायबच होता. रक्तपेढीतील या रूममध्ये वातानुकूलित वातावरण असण आवश्यक असताना प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ब्लड डोनेट रूम, रक्त तपासणी लॅब, ब्लड स्टोरेज रूममध्ये गरमीच वातावरण असते. यामुळे रक्तदान करत असताना रक्तदात्यांना चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे असे प्रकार सातत्याने घडत होते. रक्तपेढीत ज्या ठिकाणी रक्ताचा साठा केला जातो, त्या ठिकाणचा एसी कुलींग देत नसल्यानं ब्लड स्टोरेज करण्याचा ३ मशीन बंद ठेवण्याची नामुष्की येथील कर्मचाऱ्यांवर ओढवली होती. त्यामुळे या रूमचे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवाव्या लागत होत्या. रक्ताची गरज तातडीनं भासत असताना या गैरसोयींमुळे रक्तपेढीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होत. युवा रक्तदाता संघटनेने रक्तपेढीच्या या समस्याबाबत आवाज उठवून १५ ऑगस्ट रोजी बांधकामच्या अधिकाऱ्यांनाच जागेवरून हलू न देण्याचा इशारा देताच प्रशासन खडबडून जाग झाले. त्यामुळे तब्बल ३ वर्ष बंद असलेला या रक्तपेढीतील एसी कार्यान्वित करण्यात आला. त्यामुळे ब्लड स्टोरेज रूममधील बंद ठेवण्यात आलेल्या मशिनरी पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तसेच अन्य कामांना देखील लागलीच सुरवात केली आहे.  त्यामुळे रूग्णांची गैरसोय दुर होणार असून रुग्णालय प्रशासनाचा मनस्ताप देखील आता टळला आहे. गेले ३ वर्ष सतत पाठपुरावा करून देखील काम होत नव्हत, परंतु ते काम आता युवा रक्तदाता संघटनेच्या ठोस भूमिकेमुळे होत आहे. यासाठी युवा रक्तदाता संघटना व देव्या सुर्याजी यांचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील आणि ब्लड बँक कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत.

Advertisements

Related Stories

‘त्या’ पाचहीजणांचा रिपोर्ट निगेटिव्ह

NIKHIL_N

साटेली भेडशी ग्रामस्थांचा घेराव मागे

NIKHIL_N

सौजन्य जाधव याची सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट संघात निवड

NIKHIL_N

रत्नागिरी : लोटेतील घरडा कंपनीत स्फोट, तीन कामगारांचा मृत्यू, तिघे गंभीर

Abhijeet Shinde

कोरोना प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करा

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य अधिकार्‍यासह 40 नवे कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!