तरुण भारत

केर-भेकुर्ली ग्रा. पं. उद्यापासून नव्या इमारतीत

दोडामार्ग / वार्ताहर :
आदर्श गाव केर-भेकुर्ली ग्रामपंचायतीचे कार्यालय रविवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता नूतन इमारतीत स्थलांतरीत होत आहे. त्यानिमिताने नूतन इमारत उद्घाटन सोहळा व सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार  दिपक केसरकर सह कार्यक्रम अध्यक्ष स्थानी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, प्रमुख पाहुणे जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती अनिशा दळवी, जि. प. सदस्या संपदा देसाई, पं. स. सभापती संजना कोरगावकर, उपसभापती सुनंदा धर्णे, पं. स. सदस्य बाबुराव धुरी, लक्ष्मण नाईक, धनश्री गवस, गणपत नाईक, तहसीलदार अरुण खानोलकर, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच मिनल देसाई, उपसरपंच महादेव देसाई, ग्रा. पं. सदस्य तसेच आजी माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य ग्रुप ग्रामपंचायत केर – भेकुर्ली यांनी केले आहे.

Related Stories

मुंबईहून आलेली युवती कोरोना पॉझिटिव्ह

NIKHIL_N

श्वसनाच्या आजाराचे आणखीही काही रुग्ण!

NIKHIL_N

लांजा- साटवली मार्गावर बापेरे येथे झाड पडल्याने मार्ग 4 तास ठप्प

Patil_p

योजना इंडस्ट्रीज, विनविड केमिकल बंद करण्यासाठी उद्यापर्यंत डेडलाईन

Patil_p

खोदकामात पाईपलाईन फोडल्याने तब्बल दहा मिनिटे गॅस लिकेज

Patil_p

श्रावणाची लहर…रानभाज्यांचा बहर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!