तरुण भारत

कोल्हापूर : पंचगंगा नदी पात्रास अडथळा ठरणाऱ्या पुलांच्या भरावाबाबत लवकरच निर्णय – पालकमंत्री

सप्टेंबरपर्यंत होणार तालुकानिहाय आढावा बैठकी

प्रतिनिधी / चंदूर

Advertisements

पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज हातकणंगले तालुक्यातील रुई गावातील पुलास भेट दिली. यावेळी मौजे रुई गावात 2019 व 2021 साली आलेल्या महापूरास रुई पुलाच्या बंधाऱ्यावरील भराव कारणीभूत असल्याची तक्रार रुई बंधारा विरोधी कृती समिती, इंगळी, वसगडे,रुकडी, माणगाव, पट्टणकोडोली आदी गावच्या नागरिकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या समोर मांडले.

या पुलाच्या भरावामुळेच आजूबाजूची सात ते आठ गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे म्हणणे मांडण्यात आले. यावर पालकमंत्री यांनी लवकरच तोडगा काढला जाईल. सप्टेंबर पर्यंत हातकलंगले आणि शिरोळ तालुक्‍यातील पंचगंगा नदी पात्रात येणाऱ्या सर्व पुलांच्या भरावा बाबत आढावा घेणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर विविध गावातील लोकप्रतिनिधिनी गावचे पुनर्वसन, 2019 प्रमाणे नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी मा. खासदार निवेदिता माने,आमदार राजूबाबा आवळे,मा.आमदार राजीव आवळे, डॉ. सुजित मिनचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, अभय काश्मीरे, राजू बेनाडे, सुभाष चौगुले,रुई सरपंच सौ.मुजावर,ता.प.स.महेश पाटील, चंदूर सरपंच अनिता माने, उपसरपंच भाऊसाहेब रेंदाळे, रुई पोलीस पाटील नितीश तराळ आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर : चिकोत्रा धरण पुर्ण क्षमतेने भरले

Abhijeet Shinde

अफवा पसरवल्याबद्दल 230 गुन्हे दाखल

Abhijeet Shinde

मलकापूर उपनगराध्यक्ष निवड बिनविरोध

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी २५ उमेदवारांची निवड

Abhijeet Shinde

खिद्रापुरात पडझड झालेल्या घरांचा पायाभरणी शुभारंभ; अभिनेता सलमान खानची मदत

Abhijeet Shinde

सर्व दुकाने सुरू ठेवण्याची मागणी फेटाळली

Abhijeet Shinde
error: Content is protected !!