तरुण भारत

कोल्हापूर : शिरोली औद्योगिक वसाहत येथे ट्रकने घेतला पेट

प्रतिनिधी / शिरोली

शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये कारखान्यातील जॉब घेऊन जाण्यासाठी आलेल्या मिनी ट्रकला अचानक आग लागली. या आगीत ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. तर ट्रकची केबीन जळून खाक झाली आहे. ही घटना शनिवार दि १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, चेन्नई (तामिळनाडू) येथील माल वहातुकीचा मिनी ट्रक शिरोली औद्योगिक वसाहतीमधील स्प्रे अॅटो या कंपनीत आला होता. माल तयार नसल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करुन चालक केबिन मध्ये विश्रांती घेत होता.

दरम्यान अचानक ट्रकच्या केबीनमध्ये आग लागली. आग लागताच चालक केबिन मधून तत्काळ बाहेर आला. त्यामुळे जिवीतहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महापालिकेची अग्नीशमन गाडी आली. त्यातील जवानांनी बंबातील पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. याची माहिती समजताच कामगारांनी मोठी गर्दी केली होती.पुंडलिक पोवार, विजय सुतार, व उमाजी निकम यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Advertisements

Related Stories

खासदार संजय मंडलिक-शहर प्रमुख रविकिरण इंगवले भेटीची शहरात चर्चा

Abhijeet Shinde

घाटाई देवी देवराई परिसरात 30 पिशव्या कचरा केला गोळा

Patil_p

महावितरणकडून राधानगरी धरणाचा वीज पुरवठा खंडित

Sumit Tambekar

आरे येथे महापुराच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी आढावा बैठक

Abhijeet Shinde

जरगी येथे गवा रेड्यांचा भातपिकांत हैदोस

Abhijeet Shinde

पिक नुकसान भरपाई मिळणार, पण तुटपुंजी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!