तरुण भारत

ई-पीक पाहणी कार्यक्रमावर ‘कृषी’चा बहिष्कार!

चिपळूण

शासनाने ‘ई पीक पाहणी’ कार्यक्रम आखला असून मोबाईल ऍपच्या माध्यमातून पीक नोंद करण्याचे काम कृषी सहाय्यकांवर सोपवण्यात आले आहे. मात्र पिकाची नोंद घालण्याची जबाबदारी महसूल विभागातील तलाठय़ाची असतानाही हे काम कृषी सहाय्यकांवर लादले गेल्याचे सांगत नियमबाह्य कामावर राज्य कृषी सहाय्यक संघटनेने बहिष्कार टाकला आहे.

Advertisements

  शेतजमिनीच्या उताऱयावर पिकांची नोंद करण्याची पध्दत आहे. या संदर्भात शासनाने ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम आखला असून त्याच्या नोंदीसाठी एक मोबाईल ऍप विकसित करण्यात आले आहे. या कामासाठी महसूल विभागातील तलाठय़ासह कृषी सहाय्यकांचा समावेश करण्यात आला आहे. पीक नोंदीचे काम  तलाठय़ांचे असून ती पूर्णतः जबाबदारी त्यांची आहे. या संदर्भातील सखोल माहितीही कृषी सहाय्यकांना नसताना त्यांच्यावर हे काम लादले जात आहे. त्यातच ऑगस्टअखेरीस हे काम पूर्ण करावे लागणार  आहे. त्यामुळे हा अतिरिक्त भार नकोसा ठरलेल्या कृषी सहाय्यक राज्य संघटनेने या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तालुका संघटनाही या कामावर बहिष्कार टाकणार असल्याचे पत्र कृषी अधिकारी तसेच महसूलला दिले आहे.

   पीक नेंदणी करणे आमचे कामच नव्हे

पीक नेंदणी करणे, हे आमचे कामच नसताना ते लादले जात आहे. पीक नेंदणी करणे तलाठय़ाचे काम आहे. कृषीकडून शेती पंचनामे केले जातात, त्यावेळेस तलाठय़ाकडून किती प्रमाणात आम्हाला सहकार्य मिळते? आमचे काम कृषीसंदर्भातील असून पीक नोंदणीचे नाही. या संदर्भातील कोणतेच ज्ञान आम्हाला नाही. तरीही कृषी सहाय्यकांवर हा अतिरिक्त भार टाकला जात आहे.

                                              -जगदीश काते                                अध्यक्ष, चिपळूण-कृषी सहाय्यक

Related Stories

डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

Patil_p

शिक्षक बदल्यांचा तिढा अद्यापही कायम?

Patil_p

दापोलीमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत

Abhijeet Shinde

रत्नागिरीत कोरोना रुग्णांवर आता ‘म्युझिक थेरपी’

Abhijeet Shinde

राजकारण बाजुला ठेऊन जनतेच्या अडचणी सोडवुया

Patil_p

रत्नागिरी : दापोलीत संविधान दिन उत्साहात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!