तरुण भारत

स्मारक स्वच्छता अभियान

प्रतिनिधी बेळगाव

 स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या  वर्षपूर्ती निमित्त येथील  शौर्य चौक मधील गांधी स्मारकाची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदर मोहीम 25 कर्नाटक बटालियन एनसीसी,  26 कर्नाटक बटालियन एनसीसी आणि  8एअर स्क्वाड्रन बेळगाव  एनसीसी मधील  विद्यार्थ्यांकडून   आयोजित करण्यात आली होती. ही मोहीम कर्नल के श्रीनिवास ग्रुप कमांडर एनसीसी बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, यावेळी सर्व एनसीसी विद्यार्थ्यांनी कोरोना  नियमावलीचे पालन करून या मोहिमेत भाग घेतला होता.

Advertisements

 या मोहिमेदरम्यान ग्रुप कमांडर एनसीसी बेळगावच्या वतीने  स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत  सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच  वेगवेगळय़ा ऑनलाइन स्पर्धा,  चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पोस्टर स्पर्धेत भाग घेतलेल्या एनसीसी विद्यार्थ्यांचे  यावेळी कौतुक करण्यात आले. याप्रसंगी ग्रुप कमांडर ऑफिसर, ग्रुप कमांडिंग ऑफिसर, 25 कर्नाटक एनसीसी बटालियनचे  कर्नल अभय अवस्थी, ऍडम  ऑफिसर लेफ्टनंट कर्नल राजीव साहनी, पीआय स्टाफ, आणि 25, 26  कर्नाटक बटालियन अधिकारी  उपस्थित होते

Related Stories

बळ्ळारी नाल्याची कथा-शेतकऱयांच्या व्यथा

Omkar B

बाजारपेठेतील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे मनपाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

‘नागरिकत्व’ विरोधात रायबाग बंद कडकडीत

Patil_p

कर्नाटक-महाराष्ट्र बससेवेला प्रारंभ कधी?

Patil_p

गणेशोत्सवाबाबतच्या अटींचे पालन करा

Patil_p

91 हजार धनाढय़ांची बीपीएल रेशनकार्डे रद्द

Patil_p
error: Content is protected !!