तरुण भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला केले संबोधित

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लाल किल्ल्यावरुन मुलींसाठी केली मोठी घोषणा


ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

Advertisements

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रथेप्रमाणे लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी देशाला संबोधित करताना देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्यावर त्यांनी भाष्य केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशभरातील मुलींसाठी मोठी घोषणा केली आहे.

देशातील सर्व क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीने दिसत असून फक्त भारतीय सैन्यदलात मात्र याबद्दल व्यस्थ प्रमाण असल्याचे स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींना यापूर्वी संधी मिळत नसे. आता मात्र देशातील सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी आपल्या भाषणा दरम्यान केली आहे. यामूळे सैन्यात मुलींचे प्रमाण वाढणार आहे. पंतप्रधान म्हणाले की आता सरकारने ठरवलं आहे, देशातल्या सैनिकी शाळा मुलींसाठी देखील उघड्या राहतील. देशातल्या सर्व सैनिक शाळांमध्ये मुली देखील शिकतील” या मुळे सैन्यात मुलींना ही करियर घडवण्याची संधी मिळणार आहेत.

आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनापासून ते देशातील क्रीडा, उद्योग क्षेत्राविषयी देखील मत मांडले. शिक्षा, खेळ बोर्डाचे निकाल, ऑलिम्पिकचं, मैदान, यात मुली अभूतपूर्व कामगिरी करत आहेत. आपल्याला हे ठरवायचंय की महिलांबद्दल सुरक्षिततेची भावना वाढावी, सन्मानाची भावना निर्माण व्हावी.यासाठी देशातील सरकारला, प्रशासनाला आणि नागरिकांना आपली १०० टक्के जबाबदारी पार पाडावी लागेल असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

शिक्षण विस्तार अधिकारी आर. व्ही. कांबळेंची होणार चौकशी

Abhijeet Shinde

कोरोना सातारा शहराचा फास आवळू लागला

Patil_p

वीज बिलात तात्काळ सूट द्या; राज ठाकरेंचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र

Rohan_P

फेसबुकप्रकरणी लष्कराला दिलासा नाही

datta jadhav

उत्तराखंड : गेल्या 24 तासात 429 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

जम्मू काश्मीर : श्रीनगरच्या लारापोआमध्ये दहशतवादी हल्ला

Rohan_P
error: Content is protected !!