तरुण भारत

मुल्ला बरादर होणार अफगाणिस्तानचा नवा राष्ट्रपती

ऑनलाईन टीम / काबुल :

तालिबानने अफगाणिस्तानातील राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतल्यानंतर त्याचे नाव ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ असे केले. रविवारी मध्यरात्री तालिबान्यांनी सरकार स्थापनेचीही घोषणा केली . त्यानंतर आता तालिबानने मुल्ला अब्दुल गनी बरादर यांना भावी राष्ट्रपती घोषित केले आहे.

Advertisements

1994 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानी आंदोलनाची सुरुवात करणाऱ्या चार जणांपैकी मुल्ला बरादर एक होते. 2001 मध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन इमारतींवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने तालिबानविरुद्ध युद्ध छेडले. त्यावेळी तालिबान शरण आल्यानंतर मुल्ला बरादरने दहशतवादाचे नेतृत्व स्वीकारले. अमेरिका-पाकिस्तानच्या संयुक्त अभियानात त्याला 2010 मध्ये पाकिस्तानच्या कराचीमधून अटक करण्यात आली. मात्र, तालिबानसोबत करार झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने 2018 मध्ये त्याची सुटका केली.

Related Stories

महाराष्ट्र : मागील 24 तासात 95 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग

Rohan_P

‘लालबागचा राजा’ मंडळाचे पी. चिदंबरम यांच्याकडून अभिनंदन

Rohan_P

दिल्लीत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्यास सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत

Rohan_P

शरीरातील कोरोनाचा ‘मित्र अन् शत्रू’ उघड

Patil_p

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पंतप्रधान मोदींना कोविड परिस्थितीची दिली माहिती

Abhijeet Shinde

अभिमानास्पद! सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव

Abhijeet Shinde
error: Content is protected !!