तरुण भारत

सांगली : कोकरूड पोलीस ठाणेला ए प्लस प्लस, आयएसओ स्मार्ट पोलीस स्टेशन नामांकन

वार्ताहर / कोकरूड

सांगली जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांच्या कल्पनेतून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी स्मार्ट बनवण्यात आली. त्यातून आयएसओ मानांकनासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. यात कोकरूड पोलीस ठाण्यास ए प्लस प्लस असे नामांकन देण्यात आले.

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या परीने खर्च करून, संपूर्ण इमारतीची रंगरंगोटी, अपडेट दप्तर , बोलकी कपाटे, स्वच्छता करून पोलीस ठाणी स्मार्ट बनवण्यात आली. वरिष्ठांच्या तपासणी पथकाने, सर्व पोलीस ठाण्यांची तपासणी करून निकाल जाहीर केला यात कोकरूड पोलीस ठाण्याने बाजी मारली.

कोकरूड पोलीस ठाण्याचे सपोनि ज्ञानदेव वाघ यांनी अथक परिश्रम घेऊन व अगोदरच निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या, या पोलीस ठाण्याच्या इमारतीला रंगरंगोटी करून वेगळा लूक दिला तर आवारातील सर्व झाडे बोलकी केली. अद्ययावत दप्तर ,माहिती फलक, फायली,कपाटे, परिसर स्वच्छता, हद्दीवरील फलक, स्वछता ग्रह, महिला पोलीस विश्राम इमारत आदी अपडेट व बोलके करून, पोलीस ठाणे स्मार्ट बनवले.पथकाच्या तपासणीतून कोकरूड पोलीस ठाण्याला आयएसओ स्मार्ट पोलीस स्टेशन नामांकन मध्ये ए प्लस प्लस नामांकन मिळाले.

आयएसओ नामांकन प्रमाणपत्र वितरण सोहळा सांगली येथील जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात पार पडला.यावेळी मा. पालकमंत्री जयंत पाटील ,कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस प्रमुख दिक्षितकुमार गेडाम , सांगली, यांच्या हस्ते आयएसओ नामांकन प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कोकरूड पोलीस ठाणेस ए प्लस प्लस, आयएसओ नामांकन मिळल्याबद्दल सपोनि ज्ञानदेव वाघ व त्यांच्या सर्व टीमचे कौतूक होत आहे.

Advertisements

Related Stories

कोयनेचा विसर्ग आणखी 20 हजार क्युसेकने कमी

Abhijeet Shinde

सांगली : आज होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमास भाजप पदाधिकाऱ्यांचा बहिष्कार

Abhijeet Shinde

परदेशात जाणाऱ्या ५० जणांना लस

Abhijeet Shinde

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सळी चोरणारे दोन आरोपी जेरबंद

Abhijeet Shinde

अलमट्टी धरणातून अडीच लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

Abhijeet Shinde

चोऱ्या रोखण्यासाठी ग्राम सुरक्षा दल ठेवणार पाळत

Sumit Tambekar
error: Content is protected !!