तरुण भारत

तालुक्याच्या पूर्वभागात ऊस बांधणी कामाला वेग

वार्ताहर /सांबरा

तालुक्याच्या पूर्वभागामध्ये ऊस पीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात आले असून सध्या ऊस बांधणीचे काम जोरात सुरु आहे. पूर्व भागातील बसवन कुडची, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, पंत बाळेकुंद्री, मोदगा, सुळेभावी आदी गावात ऊसपीक मोठय़ा प्रमाणावर घेण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ओल्या गवताचे नुकसान झाले असल्याने शेतकऱयांना ऊस पिकावर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या ऊस बांधणीचे काम सुरु असल्याने ऊस पिकातील चाऱयाचा शेतकऱयांना लाभ होत आहे. या भागातील ऊस हा साखर कारखान्यांना व गुऱहाळ घरांना जातो. अलिकडच्या काळामध्ये गुळाला व साखरेला चांगला दर मिळत असल्याने शेतकरीवर्ग ऊस पिकाकडे वळला आहे. त्यामुळे ऊस शेतीचे प्रमाण काहीसे वाढले आहे. अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे बांधावरील ओल्या गवताचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱयांना एक तर सुका चारा जनावरांना घालावा लागत आहे. त्याचबरोबर ऊस पिकातील ओला चारा यावर सध्या शेतकरीवर्ग अवलंबून आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे लवकरच ओल्या चाऱयाचा प्रश्नही मिटणार आहे.

Advertisements

अरविंद जाधव, शेतकरी बाळेकुंद्री खुर्द

सध्या ऊस बांधण्याचे काम जोरात सुरु आहे. मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे शिवारात पाणी साचल्याने ऊस पिकाची म्हणावी तशी वाढ झालेली नाही व ऊस पिकावर रोगही पडला आहे. दरवर्षी उसाची एक विशिष्ट वाढ झाल्यानंतर बांधणी केली जाते. पाऊस, वाऱयामुळे ऊस पडू नये म्हणून उसाची बांधणी केली.

अमृत निलजकर, शेतकरी बाळेकुंद्री खुर्द

सध्या शिवारात ऊस बांधणीचे काम जोरात सुरु आहे. या वर्षी ऊसाची लागवड मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली आहे. त्यामुळे ऊस बांधणीचे काम पूर्ण होण्यास अजून बरेच दिवस लागणार आहेत. ऊस बांधणीमुळे ओल्या चाऱयाचाही प्रश्न संपुष्टात आला आहे.

Related Stories

वीट व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका

Omkar B

रायबाग मिनी विधानसौध प्रवेशद्वारावर आंदोलन

Patil_p

संवेदनेतून साहित्याची निर्मिती

Patil_p

बुधवारी चार उमेदवारी अर्ज मागे

Amit Kulkarni

निपाणीत हुतात्मादिन गांभीर्याने

Patil_p

रविवारी जिल्हय़ात 143 रुग्ण पॉझिटिव्ह

Amit Kulkarni
error: Content is protected !!