तरुण भारत

सोमवारी 42 जणांनी केली कोरोनावर मात

11 नवे रुग्ण, बेळगावातही संख्या घटली

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

सोमवारी जिल्हय़ातील 42 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना वेगवेगळय़ा इस्पितळांतून घरी जावू देण्यात आले आहे. तर गेल्या 24 तासांत 11 नवे रुग्ण आढळून आले असून बेळगाव शहर व तालुक्यातही रुग्णसंख्या घटली आहे.

महांतेशनगर, टी. व्ही. सेंटर, वीरभद्रनगर, सहय़ाद्रीनगर, वडगाव परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बेळगावात 5 रुग्ण आढळून आले आहेत. एकूण बाधितांची संख्या 78 हजार 801 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 77 हजार 508 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

अद्याप 412 सक्रिय रुग्ण आहेत. मृतांचा सरकारी आकडा 881 वर पोहोचला आहे. अथणी, बैलहोंगल, खानापूर, रामदुर्ग, रायबाग, सौंदत्ती तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही. तर हुक्केरी, गोकाक, तालुक्मयात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. अद्याप 2 हजार 15 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे.

Related Stories

निपाणी तालुक्यात यात्रा, बाजार बंदी

tarunbharat

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

Amit Kulkarni

शांतीसागर महाराजांवर काढावे पोस्टल तिकीट

Patil_p

बेळगाव जिह्यात गुरुवारी 185 जणांना कोरोनाची बाधा

Rohan_P

सोनं पावलांनी आली गौराई..!

Amit Kulkarni

कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमी बालकाचा मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!