तरुण भारत

सदलगा येथे पंजाभेटी, पीर मिरवणूक रद्द

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमावली : शहरात कडक पोलीस बंदोबस्त

वार्ताहर /सदलगा

Advertisements

सदलगा येथे मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर चिकोडीचे तहसीलदार प्रविण जैन यांनी सोमवार 16, 18 आणि 19 ऑगस्ट रोजी सी.आर.पी.सी. 1973 कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. तहसीलदारांच्या आदेशानुसार सदलगा येथील प्रसिद्ध मोहरम सणातील पंजाभेटी करू नयेत, ढोल-ताशा, हलगीच्या वाद्यात पीर मिरवणूक काढू नये, दोन-चार अशा मोजक्मयाच लोकांच्या उपस्थितीत जागेवरच पूजा, ऊद घालणे आदी धार्मिक कार्यक्रम करावेत. गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यासाठी सदलगा पोलीस ठाण्यामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायद्याला बाधा येऊ नये यासाठी केएसआरपी तसेच डीआरए आणि जास्तीची पोलीस कुमक ठेवण्यात आली आहे . यामुळे  सोमवारी 16 ऑगस्ट रोजी रात्री नियोजित मिरवणुकीद्वारे होणारी पंजाभेटी, 18 ऑगस्टच्या रात्री कत्तल रात्रीच्या दिवशी मिरवणुकीद्वारे होणारी पंजाभेट आणि 19 ऑगस्ट रोजी दुपारी मोहरमच्या मुख्य दिवशी मिरवणुकीद्वारे वाजंत्रीच्या दणदणाटात होणारी पंजाभेटी होताना कोरोना नियमावलीचे उल्लंघन होऊ नये, यासाठी निर्बंध घातले आहेत. याची विविध मंडळे तसेच भाविकांनीही निर्बंधाची दखल घेऊन यावषी पंजाभेटी, पीर नाचवण्याचा कार्यक्रम रद्द केला आहे. सदलग्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मोहरम सण रद्द करण्यात आल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहरम साठी होणारी गर्दी रोखण्यासाठी चिकोडीचे तहसीलदार प्रवीण जैन यांनी जारी केलेल्या 144 कलमअन्वये जमावबंदी आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सोमवारी पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन पथसंचलन केले.

Related Stories

हंदिगनूर येथील प्राथमिक शाळेत वृक्षारोपण

Amit Kulkarni

नाल्यात कचरा साचण्यास कारणीभूत कोण?

Amit Kulkarni

मेरडा गावच्या महाबळेश्वर पाटील यांना वाढता पाठिंबा

Patil_p

वेग आणि वेध यांचा मिलाफ म्हणजे खो-खो

Amit Kulkarni

नवे खांब; दिवे मात्र जुनेच

Amit Kulkarni

संपगाव येथील जवानाचा नागालॅन्डमध्ये मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!