तरुण भारत

Maharashtra Rain: राज्यात पुढील २ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता


मुंबई \ ऑनलाईन टीम

येत्या १ ते २ दिवसांत महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि संपूर्ण राज्यभर ४८ तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान विभागानं औरंगाबाद, जालना, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी केला असून बुधवारी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने काल वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात पावसानं हजेरी लावली आहे.रायगड, रत्नागिरी, पुणे, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, लातूर, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, बुलडाणा, जळगाव, अहमदगर, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला असून बुलडाणा,वाशिम, जालना, बीड, अहदनगर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना 18 ऑगस्टसाठी यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisements

Related Stories

सवदी यांचे वक्तव्य कर्नाटकातील जनतेला खुश करण्यासाठी : उपमुख्यमंत्री अजित पवार

Abhijeet Shinde

रॉबिनहूड आर्मी समाजसेवकांकडून परप्रांतीय कर्मचाऱ्यांना मदत

Abhijeet Shinde

जिल्हा न्यायालयानजीक भीषण अपघात; कोल्हापूरचे 2 युवक ठार

datta jadhav

मिरज मेडिकलच्या ५५ विद्यार्थिनी ओमायक्रोन बाधित

Sumit Tambekar

गणेशोत्सव सार्वजनिकपणे साजरा करण्यासंबंधी तज्ञांशी चर्चेनंतर निर्णय

Patil_p

यापुढे गाव काही सोडणार नाही!

NIKHIL_N
error: Content is protected !!