तरुण भारत

सांगली : सराईत गुंड भावश्या पाटीलला सक्तमजुरीची शिक्षा

खंडागळे पिता-पुत्रावरील हल्ला प्रकरण

प्रतिनिधी / इस्लामपूर

Advertisements

वाळवा तालुक्यातील रेठरेधरण येथील संताजी दादासो खंडागळे यांच्यासह त्यांच्या वडीलांवर हल्ला करून जखमी केल्या प्रकरणातील सराईत गुन्हेगार भाऊसो उर्फ भावश्या वसंत पाटील याला तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. येथील प्रथगवर्ग न्याय दंडाधिकारी आर.डी.चौगुले यांनी ही शिक्षा सुनावली. सध्या भावश्या हा संताजी यांच्या खून प्रकरणी कारागृहात आहे.

जून्या भांडणाच्या रागातून दि. १२ जानेवारी २००५ रोजी दुपारी २ वाजता हा प्रकार घडला होता. संताजी खंडागळे व दादासो खंडागळे हे आपल्या मोटर सायकलवरून शेताकडून घरी जात होते. दरम्यान भावश्या व त्याचा चुलता हिंदूराव भानुदास पाटील हे त्यांच्या दुचाकीच्या आडवे आले. त्यावेळी भावश्याने संताजी यांच्या डाव्या हातावर गज मारून गंभीर जखमी केले. तर हिंदूराव याने दादासाहेब खंडागळे यांच्यावर कुहाड उगारुन हल्ल्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी खंडागळे यांनी या दोघांविरुध्द इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक फौजदार एस.ए .शिंदे यांनी करुन दोघां विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र भावश्याचा चुलता हिंदुराव हा या हल्ल्यापासून परागंदा आहे. तो पोलीसांच्या हाती न लागल्याने हा खटला केवळ भावश्या विरुद्ध चालला. न्यायाधीश चौगुले यांच्या समोर सुनावणी झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुर्यकात बी.पोवार यांनी काम पाहिले.विशेष म्हणजे खंडागळे पिता-पुत्र मृत असताना आणि या गुन्ह्यातील शस्त्रे पोलीस ठाण्यातून गहाळ झालेली असताना अन्य पुराव्याच्या आधारे न्यायाधीश यांनी भावश्याला सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Related Stories

सांगली : ऊसतोड मजूरांकडून शेतकऱ्याला १४ लाखांचा गंडा

Abhijeet Shinde

सांगली : अँटिजेनमध्ये मनपाचे तीन कर्मचारी पॉझिटिव्ह, ५८ नवे रुग्ण

Abhijeet Shinde

‘अमृत’ च्या नावाखाली ‘विष’?

Abhijeet Shinde

सांगली : ‘सिनर्जी’मुळे वैद्यकीय पंढरीला ‘एनर्जी’ – जयंत पाटील

Abhijeet Shinde

म्हैसाळ बंधाऱ्यातून मिरजेचा तरुण बेपत्ता

Abhijeet Shinde

सांगली : सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर बांधकाम कामगारांची निदर्शने

Abhijeet Shinde
error: Content is protected !!