तरुण भारत

महाराष्ट्र शासनाच्या आदर्श केरला विकास निधी कमी पडू देणार नाही- दीपक केसरकर

दोडामार्ग / प्रतिनिधी: 
महाराष्ट्र शासनाच्या आदर्श केरला विकास निधी कमी पडू देणार नाही शिवाय ग्रामस्थांची मागणी विचारात घेऊन शिरवलमार्गे नीडल, केर, भेकुर्ली अशी एसटीची फेरी आपण सुरू करण्यासाठी प्रयत्न करेन अशी ग्वाही आमदार दीपक केसरकर यांनी दिली. ग्रामपंचायत केर भेकुर्ली येथे नूतन ग्रामपंचायत केर ग्रामपंचायत इमारत स्थलांतर सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत जि. प. अध्यक्षा संजना सावंत, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती अनिशा दळवी, पं. स. सभापती संजना कोरगावकर, उपसभापती सुनंदा धर्णे, पं. स. सदस्य बाबुराव धुरी, धनश्री गवस, तहसीलदार अरुण खानोलकर, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ आदी उपस्थित होते.
यावेळी जि. प अध्यक्ष सौ. सावंत म्हणाल्या केर गावच्या विकासासाठी जिल्हा परिषदेकडून जे आवश्यक सहकार्य हवे असेल ते दिले जाईल. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचे प्रस्ताव करा निधी आपण देऊ असेही सांगितले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोरोना काळात विशेष काम करणाऱ्या गावातील जवळपास 25 व्यक्तींचा तसेच शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी – विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेविका सुजाता जगताप, प्रास्ताविक उपसरपंच महादेव देसाई यांनी तर आभार ही उपसरपंच देसाई यांनी मानले.

Related Stories

जिल्हय़ात अतिमुसळधार पावसाचा इशारा

Patil_p

सातोसेची कन्या मुंबईत लिलावतीमध्ये कोरोना ‘वॉरियर’

NIKHIL_N

मुंबईतील चाकरमान्यांना घेऊन पहिली लालपरी मंडणगड तालुक्यात दाखल

Abhijeet Shinde

राज्यातील सर्वाधिक डेल्टा प्लसचे रूग्ण रत्नागिरीत

Patil_p

एसटी कामगार, इंटक पदाधिकारी कामगार सेनेत

NIKHIL_N

डॉक्टरच कोरोनाबाधित होत असल्याने उभे ठाकले अनेक प्रश्न

Patil_p
error: Content is protected !!