तरुण भारत

अमेरिकन सैन्याकडून 3200 नागरिकांची सुटका

ऑनलाईन टीम / काबुल : 

तालिबानने सत्ता काबिज केल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तालिबानचा वाढता धोका लक्षात घेता नागरिक देश सोडत आहेत. अमेरिकन लष्कर या लोकांना वाचवण्यासाठी मेहनत घेत असून, आतापर्यंत अफगाणिस्तानातून 3200 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.  बुधवारी अमेरिकन सैन्याने 1100 अमेरिकन नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुटका केली.अमेरिकन लष्कराच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Advertisements

आतापर्यंत सुटका करण्यात आलेल्या 3,200 लोकांमध्ये अमेरिकन कर्मचारी तसेच 2,000 अफगाण विशेष स्थलांतरित आहेत. या सर्वांना अमेरिकेत स्थानांतरित करण्यात आले आहे. 

Related Stories

अमेरिकेत बाधितांची संख्या 2.75 कोटींवर

datta jadhav

…तर भारतासाठी चीनविरोधात लष्करी कारवाईचा मार्ग खुला

datta jadhav

फिलिपीन्समध्ये बॉम्बस्फोट; 14 ठार

datta jadhav

जपानमध्ये ‘टॉयलेट चोर’ जेरबंद

Patil_p

भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांचा नोंदवला जाणार जबाब

Abhijeet Shinde

माजी केंद्रीयमंत्री ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन

Patil_p
error: Content is protected !!