तरुण भारत

“पुण्यात महाविकास आघाडीचं एक काम दाखवा आणि ३० हजारांचं बक्षीस मिळवा”

मुंबई/प्रतिनिधी

विकासकामावरून राजकारणी नेहमीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. विकास कामाचे श्रेय लाटण्यासाठी भांडताना दिसतात. पण भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राज्यात महविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पुन्हा शहराच्या विकासाला खीळ बसली आहे, असा आरोप केला आहे. सोशल मीडियावरील स्पर्धेमुळे भाजप आणि राष्ट्रवादीत सध्या कलगीतुरा रंगला आहे.

मुळीक यांनी पुण्यात महाआघाडी सरकारचे एक काम दाखवा आणि ३० हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळवा, अशी ऑफर त्यांनी दिली आहे. दरम्यान, भाजपकडून राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया स्पर्धेला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राज्यात भाजप सत्तेत असताना मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली, असा दावा पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे. राज्यात महविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर विकास कामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पुन्हा शहराच्या विकासाला खीळ बसली आहे, असा आरोप मुळीक यांनी केला.

गेल्या साडेचार वर्षात पुणे मनपात भाजपची सत्ता आहे, भाजप सत्तेत असल्यापासून अनेक विकासकामे करत आहे. त्यामुळे शहरात अनेक चांगले निर्णय घेत, विकासकामे केली. तसंच मागील पाच वर्षातही जेव्हा भाजपची सत्ता होती, त्यावेळी पुण्यात अनेक विकासकामं झाली. त्याआधी १५ वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मनपामध्ये सत्ता होती, तेव्हा त्यांनी पुण्यात कोणती कामं केली ते सांगावं. उगाच भाजपला विरोध करायचा, नागरिकांमध्ये अफवा पसरावायचं काम राष्ट्रवादीकडून सुरु आहे.

Advertisements

Related Stories

अफगाण तुरुंगावर आत्मघातकी हल्ला; 29 ठार

datta jadhav

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलन प्रतिज्ञा

Rohan_P

हज यात्रेच्या फॉर्ममधील इन्कम टॅक्स रिटर्नची अट रद्द करा : जहांगीर हजरत

Abhijeet Shinde

महाविकास आघाडी नेते आणि राज्यपालांची भेट ‘या’ कारणामुळे टळली

Abhijeet Shinde

दिलासादायक : महाराष्ट्रात मागील 24 तासात 8,430 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

तोतया ‘रॉ’ अधिकाऱयाला अटक

Patil_p
error: Content is protected !!