तरुण भारत

सीपीआर आजपासून `नॉन कोरोना’साठी खुले

अन्य आजारांच्या रूग्णांवरही होणार उपचार, `नॉन कोरोना’साठी हॉस्पिटलमधील 250 बेड,
नॉन कोरोना शस्त्रक्रियांसाठी 2 ऑपरेशन थिएटर,

कृष्णात पुरेकर / कोल्हापूर

Advertisements

जिल्ह्यात 5 महिन्यांपासून सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. सीपीआर कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटलमधील रूग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रूग्ण, नॉन कोरोना रूग्णांसाठी बुधवारी, 18 ऑगस्टपासून सीपीआर हॉस्पिटलमधील 250 बेड खुले झाले आहेत. त्याची तयारीही पुर्ण झाली आहे. येथे नॉन कोरोना रूग्णांवर दोन ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीत सुरु झाली, अन् मार्चपासून सीपीआर दुसऱ्यांदा `कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटल घोषीत करण्यात आले. सीपीआरमध्ये दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांसाठी 20 हजार लिटर्स आणि 6 हजार लिटर्सचे लिक्विड ऑक्सिजन टँक उपलब्ध झाले. तसेच 550 बेडवर कोरोना रूग्णांवर उपचार सुरू होते. सीपीआरमध्ये अगदी एचआरसीटी स्कोअर 40 असलेल्या रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात सीपीआर हॉस्पिटलला यश आले आहे. कोरोना काळात नॉन कोरोना रूग्णांची उपचारासाठी कोंडी होत होती, त्यामुळे येथे नॉन कोरोना रूग्णांवर उपचाराची मागणी सातत्याने होत होती.

`सीपीआर’मधील कोरोना रूग्णांची संख्या दोनशेच्या खाली आली आहे. त्यामुळे नॉन कोरोना रूग्णांवर उपचार सुरू करावेत, अशी सुचना स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री सतेज पाटील यांनी अधिष्ठाता डॉ. मोरे यांना केली होती. सध्या सीपीआरमधील वेदगंगा इमारत, मानसोपचार, नेत्र विभाग आणि ईएनटी इमारत रिकामी आहे. यासह मायक्रो आणि ट्रॉमा अतिदक्षता विभागही नॉन कोरोना रुग्णांसाठी रिकामा झाला आहे. त्यामुळे अत्यावश्यक असलेल्या नॉन कोरोना रूग्णांसाठी येथे उपचार शक्य झाले आहेत. मानसोपचार, कान, नाक, घसा, डोळ्यांसह अन्य त्रास असलेल्या रूग्णांना येथे उपचार मिळणार आहेत. सर्पदंश, श्वानदंश, अन्य अपघाती रूग्णांवर येथे उपचार होणार आहेत. 5 महिन्यांनंतर सीपीआर टप्प्याटप्प्याने नॉन कोरोना रूग्णांना खुले झाल्याने सर्वसामान्यांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

सीपीआरमधील 250 बेड नॉन कोरोना रूग्णांसाठी खुले : डॉ. एस. एस. मोरे

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सुचनेनंतर बुधवारपासून 40 टक्के हॉस्पिटल नॉन कोरोना रूग्णांसाठी खुले झाले आहे. वेदगंगा, मानसोपचार, नेत्र, ईएनटीची इमारत उपचारासाठी तर ट्रॉमा केअर, एमआयसीयू, आयसीयू हे अतिदक्षता विभाग नॉन कोरोना रूग्णांवरील शस्त्रक्रियांसाठी उपलब्ध झाले आहेत. प्रसुती वॉर्डमधील 50 बेडही नॉन कोरोना रूग्णांसाठी खुले झाल्याने 250 बेडवर सर्वसामान्य रूग्णांवर उपचार होणार आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली.

सीपीआरमधील कोरोनाची सद्यस्थिती

एकूण बेड 335, उपचार घेणारे रूग्ण 187, पॉझिटिव्ह रूग्ण 165, संशयित रूग्ण 22, रिकामे ऑक्सिजन बेड 65, नॉन ऑक्सिजन रिकामे बेड 47, म्युकर रूग्णांसाठी उपलब्ध बेड 26, नवीन रूग्ण 15 आहेत.

Related Stories

कोल्हापूर : नगरचना विभागाचे सहाय्यक संचालक आर. एस. महाजन यांचा स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज

Abhijeet Shinde

कोजिमाशि कर्ज मर्यादा 35 लाख करणार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : तारळे खुर्द येथे चाळीस वर्षांनी रस्ता झाला अतिक्रमण मुक्त

Abhijeet Shinde

शिरगावात एकाच घरातील तब्बल 20 जण पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कामगार निधीचे १५ लाख रुपये वापरल्याबद्दल कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

मनपा कर्मचाऱ्यांची मेडिकल बिल काढताना आडवणूक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!