तरुण भारत

अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणारा मुल्ला अब्दुल गनी बरदार काबूलला परतला

काबुल \ ऑनलाईन टीम

अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणारे तालिबानचा उपनेता मुल्ला अब्दुल गनी बरदार काबूलला परतला. कतारची राजधानी दोहा येथे संघटनेच्या इतर नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तो गेला होता. मुल्ला बरादर अफगाणिस्तानातील २० वर्षांच्या युद्धाचा विजेता म्हणून उदयास आला आहे. बरादर अफगाणिस्तानचा पुढील राष्ट्राध्यक्ष बनू शकतो, अशी चर्चा देखील सुरु आहे.अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणारा मुल्ला अब्दुल गनी बरदार काबूलला परतला आहे.

Advertisements

तालिबानचा गड असलेल्या कंदाहार शहरात कतारहून सी-१७ विमानाने  मुल्ला अब्दुल गनी बरदार कडक सुरक्षा व्यवस्थेत दाखल झाला. विमानतळावर तालिबानींनी बरादरचे जोरदार स्वागत केले. 

तालिबानी आणि समर्थकांकडून कंदाहारमध्ये मुल्ला बरादरचे जोरदार स्वागत करण्यात आले. कंदाहार शहरात तालिबान संघटनेची सुरुवात करण्यात आली होती. तालिबानचा हा गड असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे बरादरने काबूलऐवजी कंदाहारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

Related Stories

रालोआ काळात 8 लाख कोटींची कर्जे ‘राईट ऑफ’

Patil_p

महाराष्ट्र : 3,509 नवीन कोरोनाबाधित; 58 मृत्यू

Rohan_P

मृतांच्या कुटुंबीयांना भेटल्या ममता

Patil_p

कोरोनाचा कहर! बिहारमध्ये केवळ 35 दिवसात 1 लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण

Rohan_P

अफगाणिस्तानवर भारत-अमेरिका चर्चा

Patil_p

पाच महिला अधिकाऱ्यांना कर्नलपदी बढती

Patil_p
error: Content is protected !!