तरुण भारत

भारतात सापडल्या कोविशिल्डच्या बनावट लसी

ऑनलाईन टीम

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. यात कोविशिल्ड, कोवॅक्सिन, मॉडर्ना, स्पुटनिक व्ही आणि नुकतीच परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन या लसी भारतीयांना दिल्या जात आहेत. यातच लसीसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर आली. लसीकरणामुळे कोरोनाची भिती काहीशी कमी होत असताना बनावट लसीमुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारत आणि युगांडामध्ये कोविशिल्डच्या बनावट लसी आढळून आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने यासंबंधी माहिती दिली आहे. याला सिरमनं देखील दुजोरा दिला आहे. WHO नं यासंदर्भातला इशारा आपल्या संकेतस्थळावर देखील दिला आहे. WHO च्या तपासणी विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

भारतामध्ये कोविशिल्ड लसीच्या २ एमएलच्या वायल्स आढळून आल्या आहेत. पण सिरम इन्स्टिट्युटकडून २ एमएलच्या वायल्स तयारच केल्या जात नाहीत. तर, दुसरीकडे युगांडामध्ये एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या कोविशिल्ड लसींची एक बॅच दिसून आली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं यासंदर्भात अधिक जागरुकपणे काळजी घेण्याचं आवाहन या देशांना केले आहे.

लस वितरणाच्या सर्व टप्प्यांवर बारीक नजर ठेवा

बनावट लसींचा धोका टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून रुग्णालये, क्लिनिक्स, आरोग्य केंद्रे, वितरक, फार्मसी आणि वितरणाच्या इतर सर्व टप्प्यांवर बारीक नजर ठेवण्याचं आवाहन केले आहे. तसेच, तुम्ही जर अशा प्रकारची लस घेतली असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं देखील आवाहनही केलं आहे.

Related Stories

हवाई दलप्रमुख फ्रान्स दौऱयावर

Patil_p

देशात 86,961 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

राज्यात दोन दिवसात कोरोनाचे 80 रुग्ण

Patil_p

दुर्बल घटकातील 17 शिक्षकांना कार्यमुक्तीची प्रतीक्षा

Patil_p

महिला दिन : ‘या’ महिलेने केले मोदींच्या ट्विटरवरून पहिले ट्विट

tarunbharat

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ रुग्णालयात दाखल

Rohan_P
error: Content is protected !!