तरुण भारत

भारताचा संदेश झिंगन क्रोएशियन लीगमध्ये खेळणार

क्रोएशियन लीगमध्ये खेळणारा भारताचा पहिलाच आंतरराष्ट्रीय खेळाडू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

संदेश झिंगन हा लवकरच क्रोएशियातील प्राव्हा एचएनएल या टॉप-टीयर लीगमध्ये खेळणारा भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ठरेल. एटीके मोहन बागान संघातून एचएनके सिबेनिक संघाशी कराराची औपचारिकता सध्या जवळपास पूर्ण झाली आहे.

मागील महिन्यात भारताचा वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून सन्मानित केला गेलेला 28 वर्षीय संदेश झिंगन हा यापूर्वीच क्रोएशियात पोहोचला असून रविवारी यजमान संघाने डॅगोव्होल्जॅकविरुद्ध विजय प्राप्त केला, त्या लढतीला तो हजर राहिला होता.

‘आम्ही संदेशची विविध स्पर्धांमधील कामगिरी यापूर्वीच पडताळून पाहिली होती आणि त्यानंतर आम्ही त्याच्याशी करार करण्याचा निर्णय घेतला. येथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्याला काही आठवडय़ांचा कालावधी जरुर लागेल. मात्र, तो यात यशस्वी होईल आणि आमच्या संघाचा महत्त्वाचा खेळाडू म्हणून नावारुपास येईल’, असा विश्वास एचएनके सिबेनिक संघाचे सीईओ प्रॅन्सिस्को कॅरडोना यांनी व्यक्त केला.

युरोपमध्ये खेळण्याची महत्त्वाकांक्षा फळणार

स्वतः संदेशने देखील कारकिर्दीतील या नव्या वळणाबद्दल आनंद व्यक्त केला. ‘मी माझ्या कारकिर्दीत एका अशा टप्प्यावर आहे, जेथे वरिष्ठ स्तरावर स्वतःला आजमावून पाहता येईल. माझ्यासाठी हे व्यासपीठ अतिशय उत्तम आहे. माझी युरोपमध्ये खेळण्याची बऱयाच वर्षापासून महत्त्वाकांक्षा होती आणि हे आव्हान मी स्वीकारले आहे. मला दिलेल्या संधीबद्दल मी मुख्य प्रशिक्षक मारिओ रोसास, संघमालक, व्यवस्थापन या सर्वांचा मनापासून आभारी आहे. प्रत्येक संधीचे सोने करण्यासाठी मी 100 टक्के प्रयत्नशील असेन’, असे तो याप्रसंगी म्हणाला.

दि. 1 डिसेंबर 1932 रोजी स्थापना झालेल्या एचएनके सिबेनिक संघाने नव्या व्यवस्थापनाखाली मागील हंगामापासून प्रीमियर डीव्हिजनमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. लीगमध्ये त्यावेळी संघाला सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. क्रोएशियातील डॅल्मातियन रिजनमधील सिबेनिक येथे हा क्लब स्थित असून या शहरातील सेंट जेम्स कॅथेड्रलचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समावेश आहे.

चंदिगढमधून कारकिर्दीला सुरुवात

संदेश झिंगनने चंदिगढमधील सेंट स्टीफन्स फुटबॉल अकादमीमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि 2011 मध्ये टॉप डीव्हिजनसाठी युनायटेड सिक्कीम संघाने त्याला पहिली संधी दिली. वयाच्या 21 व्या वर्षी त्याला उद्घाटनाच्या आयएसएल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आणि या स्पर्धेत तो 2014 मध्ये सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरला. या बळावर त्याने 2015 मध्ये भारताच्या वरिष्ठ राष्ट्रीय संघातून पदार्पण नोंदवले. त्याने फिफा 2018 वर्ल्डकप क्वॉलिफायर्समध्ये नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळला.

आयएसएल स्पर्धेत केरळ ब्लास्टर्स एफसी संघाने दोनवेळा उपजेतेपद मिळवले, त्यावेळी संदेश झिंगनचा त्यात समावेश राहिला. तो 6 वर्षे केरळ एफसी संघातून खेळला आणि 2020 मध्ये त्याने एटीके मोहन बागान संघात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर तो आता क्रोएशियन लीगमध्ये खेळताना दिसून येणार आहे.

Related Stories

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : भारताचा बांगलादेशवर एकतर्फी विजय

Amit Kulkarni

आशियाई युवा बॉक्सिंग – चोंगथमला सुवर्णपदक

Patil_p

2020 आयपीएलचे वेळापत्रक

Patil_p

ऍडलेडमध्ये बोपण्णा-रामकुमार विजेते

Patil_p

पाकचा पहिला डाव 217 धावांत समाप्त

Patil_p

ब्रिटनच्या टेनिस संघात कोंटाची गैरहजेरी

Patil_p
error: Content is protected !!