तरुण भारत

पॅरालिम्पिक्ससाठी भारताचे पहिले पथक रवाना

उद्घाटन सोहळय़ातील ध्वजवाहक थांगवेलू मरियप्पनचा प्राधान्याने समावेश, यंदाची पॅरालिम्पिक 24 ऑगस्टपासून

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

आगामी टोकियो पॅरालिम्पिक्ससाठी भारताचे पहिले पथक बुधवारी रवाना झाले. उद्घाटन सोहळय़ातील ध्वजवाहक थांगवेलू मरियप्पनचा या पथकात समावेश आहे. पहिल्या पथकातून 8 सदस्य रवाना झाले. या पथकाला निरोप देण्यासाठी क्रीडा मंत्रालयाचे पदाधिकारी, भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय पॅरालिम्पिक कमिटीचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. यंदाची पॅरालिम्पिक्स स्पर्धा दि. 24 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.

मरियप्पनसह तेक चंद व विनोद कुमार हे पहाटेच्या फ्लाईटने टोकियोकडे रवाना झाले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्रींसह अवघा देश आम्हाला यश लाभावे, यासाठी आमच्या पाठीशी आहे. पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होणारा प्रत्येक ऍथलिट हा यापूर्वीच विजेता आहे आणि माझ्याही या सर्व ऍथलिट्सना सदिच्छा आहेत’, असे भारतीय पॅरालिम्पिक्स संघटनेच्या अध्यक्षा दीपा मलिक म्हणाल्या. त्या सदर पथक टोकियोला रवाना होण्यापूर्वी विमानतळावरुन त्यांना संबोधित करत होत्या.

यंदा प्रथमच भारतीय पॅरालिम्पिक संघटनेचे ऍक्सेसिबलिटी पार्टनर स्वयम इंडिया यांच्या वतीने ऍक्सेसिबल व्हेईकल उपलब्ध करुन दिले गेले. ‘सदर ऍक्सेसिबल व्हेईकल्स ही केवळ आपल्या ऍथलिट्ससाठी नव्हे तर गरजू अशा प्रत्येक दिव्यांगासाठी उपयुक्त ठरतील, या पद्धतीने त्यांची रचना केली गेली आहे. आपले खेळाडू आपला अभिमान आहेत आणि त्यांचा प्रवास योग्य त्या सन्मानासह व्हावा, यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे’, असे स्वयम इंडियाचे संस्थापक स्मिनू जिंदाल यांनी नमूद केले.

सदर ऍक्सेसिबल व्हेईकलचा तेक चंद याच्यासाठी सर्वप्रथम विनियोग झाला. हरियाणातील रेवरी येथून तेक चंद नवी दिल्लीला याच व्हेईकलने दाखल झाला. भारतीय पॅरालिम्पिक्स कमिटीच्या अध्यक्षा दीपा मलिक यांच्यासाठी देखील असेच व्हेईकल तैनात केले गेले होते. यंदाच्या पॅरालिम्पिक्ससाठी भारतीय पथकात 14 सदस्यांचा समावेश असून यात दीपा मलिक यांचाही समावेश आहे.

पॅरालिम्पिक्स स्पर्धा दि. 24 ऑगस्टपासून खेळवली जाणार असून भारताची मोहीम दि. 25 रोजी सुरु होईल. पॅरा टेबल टेनिसमध्ये भाविना पटेल व सोनल पटेल यावेळी कोर्टवर उतरतील.

Related Stories

सुमीत नागल दुसऱया फेरीत

Patil_p

पाकच्या टी-20 संघात झाहिद मेहमूदचा समावेश

Patil_p

युकी भांब्री दुसऱया फेरीत

Patil_p

सीपीएलमध्ये ट्रिनबॅगो नाईट रायडर्स अजिंक्य

Patil_p

ओडिशा एफसीने जमशेदपूरला रोखले बरोबरीत

Patil_p

नितीश राणाला संघासमवेत सरावाची संमती

Patil_p
error: Content is protected !!