तरुण भारत

अखेर ‘त्या’ मुलांना मिळाला शाळा सोडल्याचा दाखला

पालकांसमोर शाळा प्रशासन नरमले

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शाळा सोडल्याचा दाखला व स्टडी सर्टीफिकेट देण्यास टाळाटाळ करणाऱया शाळेने अखेर पालकांसमोर नमते घेतले. बुधवारी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शाळेमध्ये बोलावून त्यांना एलसी व स्टडी सर्टिफिकेट दिले. पहिली ते दहावी पर्यंतचे सर्टिफिकेट उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.

शाळेचा निकाल वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱया वडगाव पारिजात कॉलनी येथील सेव्हन्थ डे या स्कूलने विद्यार्थ्यांना बहिस्थ पद्धतीने दहावीच्या परीक्षेला बसविले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीपर्यंतचे एलसी व स्टडी सर्टिफिकेट देण्यास शाळेकडून टाळाटाळ केली जात होती. पालक व समाजसेवी संस्थांच्या पदाधिकाऱयांनी शाळा प्रशासनाला जाब विचारताच प्रमाणपत्र देण्याची ग्वाही शाळेने दिली होती. बुधवारी पालकांना शाळेमध्ये बोलाविण्यात आले होते. त्यांना एलसी व स्टडी सर्टिफिकेट देण्यात आले. शहरातील काही शाळा निकाल वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करत आहेत. त्यामुळे असे प्रकार यापुढे घडणार नाहीत याची खबरदारी शाळा व्यवस्थापनाला घ्यावी लागणार आहे.

Related Stories

मायटी सिक्सर्सकडे जीपीएल चषक

Amit Kulkarni

बळ्ळारी : कर्नाटक-आंध्र सीमेचे सीमांकन २ महिन्यांत पूर्ण होणार

Abhijeet Shinde

बेळगाव जिल्ह्यात ब्लॅक फंगसचे ८७ रुग्ण: जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

उपनोंदणी कार्यालयातील एका एजंटला कोरोनाची लागण

Patil_p

उधारी दिली नाही म्हणून पान दुकानदाराचा खून

Amit Kulkarni

नेहरूनगरमधील समस्यांकडे मनपाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni
error: Content is protected !!