तरुण भारत

ज्योतीनगर कंग्राळी वॉर्डमधील 1500 नावे गहाळ

मतदार यादीबाबत साशंकता

बेळगाव / प्रतिनिधी

Advertisements

महापालिका निवडणुकीची घोषणा घाईगडबडीत झाल्याने सर्वांचाच गोंधळ उडाला आहे. कोरोनाकाळात मतदारयादी तयार केल्याने निम्म्याहून अधिक नावे गायब झाल्याची माहिती उजेडात आली आहे. ज्योतीनगर परिसरातील 1500 हून अधिक मतदारांची नावे यादीत नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ निर्माण झाली आहे.

महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाचा गोंधळ मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. अशातच निवडणूक आयोगाने अचानक निवडणुकीची घोषणा करून गोंधळात भर टाकली आहे. निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाची तयारी नव्हती. अशातच निवडणुकीची घोषणा झाल्याने मनपा अधिकाऱयांचा गोंधळ उडाला आहे. पण याचा फटका मतदार आणि इच्छुक उमेदवारांना बसत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असतानाच मतदारयादी तयार करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली होती. मात्र घरोघरी जाऊन मतदारांची माहिती घेणे अशक्मय होते. त्यामुळे यापूर्वीच्या मतदारयादीच्या आधारे महापालिका प्रशासनाने मतदारयाद्या तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रसिद्ध केल्या होत्या. पण मराठी भाषेतील मतदारयाद्या आक्षेपाची मुदत संपल्यानंतर उपलब्ध केल्या होत्या. तसेच लागलीच अंतिम यादीही प्रसिद्ध करण्यात आली होती. घाईगडबडीने आणि मतदारांच्या घरोघरी जाऊन माहिती न घेताच मतदारयाद्या प्रसिद्ध केल्यामुळे मतदारयाद्यांमध्ये मतदारांची नावेच नसल्याचे निदर्शनास आले आहे.

ज्योतीनगर कंग्राळी परिसरातील काही भागाचा समावेश 2006 मध्ये महापालिकेत केला होता. त्यामुळे या भागाची मतदारयादी तयार केली होती. पण या परिसरातील 1500 हून अधिक मतदारांची नावे सध्याच्या मतदारयादीतून गायब आहेत. सर्वच वॉर्डमधील मतदारांची नावे गायब झाल्याने गोंधळ उडाला आहे. कोरोनाचा हैदोस आणि प्रशासनाचा गोंधळ यामुळे निवडणुकीचे गांभीर्यच हरवले आहे. कोणतीच तयारी नसताना घोषणा केलेल्या महापालिका निवडणुकीत हजारो मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागणार आहे. प्रत्येक मतदारयादीत मतदारांची नावे गहाळ असल्याच्या तक्रारी आता समोर येवू लागल्या आहेत. मतदारयादीत नाव नोंदणीसाठी अर्ज दिला असता अर्ज स्वीकारण्यासाठी निवडणूक कार्यालयात कर्मचारी नसल्याची तक्रार होत आहे. काही मतदारयाद्यांमध्ये नावे गहाळ झाली आहेत. तर काही मतदारयादीमध्ये नावे असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मतदारयाद्यांबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मतदारयादी नेमकी खरी कोणती, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. मतदारयादीचा हा घोळ संपणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

Related Stories

गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगामसाठी 12 संघांची निवड

Amit Kulkarni

निपाणी परिसरात कोरोनाबळींची वाढती संख्या

Patil_p

शगणमट्टी येथे जुगारी अड्डय़ावर छापा

Patil_p

राज्यातील रुग्णसंख्या 4 हजार पार

Patil_p

जिल्हय़ातील 43 रुग्ण कोरोनामुक्त

Amit Kulkarni

धर्मांतर विरोधी कायदा ख्रिश्चनांना लक्ष्य करण्यासाठी नाही : मुख्यमंत्री बोम्माई

Sumit Tambekar
error: Content is protected !!