तरुण भारत

आशा बुचके यांचा भाजपमध्ये प्रवेश

ऑनलाईन टीम / मुंबई :

पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांनी शिवसेनेला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत आशा बुचके यांनी पक्षप्रवेश केला आहे.

Advertisements

आशा बुचके या शक्तीप्रदर्शन करत पुण्याहून मुंबईला रवाना झाल्या. मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आशा बुचके म्हणाल्या, शिवसेनेत असताना मी निष्ठेने काम केले.

दरम्यान, आशा बुचके यांनी जवळपास 15 वर्षे शिवसेनेचे काम केले होते. 2014 मध्ये आशा बुचके यांनी शिवसेनेकडून जुन्नर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र केवळ पाच हजार मतांच्या फरकाने त्यांना मनसेच्या शरद सोनावणेंकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 2019 मध्ये मनसेचे तत्कालीन आमदार शरद सोनवणे शिवसेनेत आले आणि त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले. त्यानंतर बुचकेंनी अपक्ष निवडणूक लढवत तिसऱया क्रमांकाची मते मिळवली होती.

Related Stories

आपण कुत्री, मांजर, कोंबड्यांचे प्रतिनिधीत्त्व करत नाही; उपमुख्यमंत्र्यांनी टोचले कान

Sumit Tambekar

एनसीबीच्या रडावर 50 सेलिब्रेटिज

Patil_p

पुणे : फटाके दुकानापासून 100 मीटरच्या परिसरात फटाके उडविण्यास मनाई

Rohan_P

ईडीच्या नावाने लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करू असे सांगतात – छगन भुजबळ

Abhijeet Shinde

राज्यात थंडीचा कडाका वाढला; बहुतांश ठिकाणचं तापमान १५ अंशांखाली

Sumit Tambekar

पुणे विभागातील 5 लाख 62 हजार 708 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P
error: Content is protected !!