तरुण भारत

वाहन स्क्रॅप पॉलिसी ; नव्या गाडीसाठी सवलत

वाहन प्रकारांनुसार सवलत शक्य : प्रदूषणाचा वेग कमी करण्यावर भर : रोड टॅक्समध्ये मिळणार सवलत

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisements

केंद्र सरकारकडून नवीन वाहन स्क्रॅप पॉलिसी लागू करण्यात येणार आहे. यामध्ये जुनी गाडी स्क्रॅपमध्ये घातल्यानंतर नवी गाडी खरेदी केल्यास सदर ग्राहकाला रोड टॅक्सवर राज्य सरकारांना अनिवार्य स्वरुपात केंद्र सरकारकडून सवलत मिळणार आहे.

सदरची सवलत ही व्यावसायिक वाहनांवर 1 ते 15 टक्के, प्रवासी वाहनांवर 1 ते 25 टक्क्यांपर्यंत मिळणार असल्याची माहिती आहे, परंतु ही सवलत देण्याचा निर्णय हा राज्य सरकारे घेणार आहेत. यासोबतच नवीन वाहनांच्या नोंदणी शुल्कात कपात होणार असल्याचीही माहिती आहे. 

सरकारी अधिकाऱयांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जुनी आणि प्रदूषण वाढीस कारणीभूत ठरणारी वाहने बाजूला करण्यासाठी काही नियम बदलण्यात येणार असून केंद्रीय मोटार कायद्यात बदल करण्यात येत आहे.

नवीन वाहनांची विक्री वधारणार

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या बदलानुसार येत्या काळात वाहन विक्रीला सुरुवात होणार असल्याचे संकेत असून नव्या स्क्रॅप पॉलिसीच्या मदतीने नवी विक्री 25 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढत जाणार असल्याचा विश्वास रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

होंडाची नवी लिवो लवकरच बाजारात

Patil_p

एमजी मोटारने विकल्या 710 कार्स

Patil_p

वाहन क्षेत्रात भरतीचे प्रमाण 29 टक्के वाढले

Omkar B

हय़ुंडाईच्या कार विक्रीत 3 टक्के वाढ

Patil_p

रॉयल इनफील्डची क्लासिक 350 लवकरच येणार

Patil_p

होंडाच्या शाईनची विक्री 1 कोटीवर

Patil_p
error: Content is protected !!