तरुण भारत

महिला विश्वचषक पात्र फेरी सामने झिंबाब्वेत

दुबई : 2022 साली होणाऱया आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीचे पात्र फेरीच्या सामन्यांचे यजमानपद झिंबाब्वे भूषविणार असल्याची घोषणा आयसीसीने गुरूवारी केली आहे. पात्र फेरीचे सामने झिंबाब्वेत 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान खेळविले जातील.

या पात्र फेरीच्या स्पर्धेत एकूण 10 संघाचा समावेश राहील. पात्रता स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. 2022 साली न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी झिंबाब्वेतील स्पर्धेतून तीन संघ पात्र ठरले जातील. आगामी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका आणि यजमान न्यूझीलंड हे संघ यापूर्वीच पात्र ठरले आहेत. झिंबाब्वेतील होणाऱया स्पर्धेत  बांगलादेश, आयर्लंड, हॉलंड, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनिया, लंका, थायलंड, अमेरिका, विंडीज आणि यजमान झिंबाब्वे सहभागी होणार आहेत.

Advertisements

Related Stories

वर्ल्ड कप सुपरलीगमध्ये भारत सातव्या क्रमांकावर

Patil_p

विश्व कनिष्ठांची बॅडमिंटन स्पर्धा जानेवारीत

Patil_p

दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नर पहिल्या कसोटीतून बाहेर

Omkar B

मुंबईची पुन्हा हाराकिरी, सर्वबाद 194

Patil_p

स्पेनची मुगुरूझा उपांत्य फेरीत

Patil_p

आला रे आला, अजिंक्य आला!

Amit Kulkarni
error: Content is protected !!