तरुण भारत

नेहरू-वाजपेयी आदर्श नेते; सर्व पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज – नितीन गडकरी


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशाचे माजी पंतप्रधान जवाहर लाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख ‘लोकशाहीचे आदर्श नेते’ असा केला आहे. सोबतच, त्यांनी सरकार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना ‘आत्ममंथनाचा’ सल्ला देखील दिला आहे.
एका कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, नेहरू आणि वाजपेयी हे भारताच्या लोकशाहीचे दोन आदर्श नेते होते आणि दोघेही मी माझ्या लोकशाहीचे सन्मानाचे पालन करीन असे म्हणायचे. अटलजींचा वारसा आमची प्रेरणा आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचेही भारतीय लोकशाहीमध्ये मोठे योगदान होते, असे गडकरी यावेळी म्हणाले.

नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात घडलेल्या घडामोडींवर भाष्य करताना नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलंय. कृषी कायदे, इंधनाच्या वाढलेल्या किंमती, पेगॅसस हेरगिरी प्रकरण या मुद्यांवरून विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्यामुळे पावसाळी अधिवेशनातील बहुतांश वेळ वाया गेला. या अधिवेशनात महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होऊ शकली नाही आणि वेळेअगोदरच अधिवेशन आटोपतं घ्यावं लागलं.

या गोंधळावरुन गडकरी म्हणाले की, “सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकदा आत्मपरीक्षण करू द्या. कारण आज जो विरोधीपक्ष आहे तो उद्या सत्ताधारी असणार आहे. तर आजचा सत्ताधारी पक्ष उद्याचा विरोधी पक्ष असणार आहे. त्यामुळे आमच्या भूमिका बदलत राहतात.

यावेळी, महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असतानाच्या आठवणींनाही गडकरी यांनी उजाळा दिला. ‘एक वेळ अशीही होती जेव्हा सदनाच्या कामकाजात अडथळा उत्पन्न करण्यात मी स्वत: पुढाकार घेत होतो. त्या दिवसांत माझी भेट अटलजींशी झाली. त्यांनी मला समजावलं की लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं वर्तन योग्य नाही. योग्य पद्धतीनं आपलं म्हणणं जनतेपर्यंत पोहचवणं हे अत्यंत गरजेचं आहे’, असं देखील गडकरी यावेळी म्हणाले.

Related Stories

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल यांना कोरोनाची लागण

Rohan_P

वातावरणातील बदलाने नागरिक हैराण

Patil_p

माझे इंग्रजी उत्तम नाही!

Patil_p

श्रेयस हॉस्पिटलला कोविड सेंटरची मान्यता

Patil_p

हाथरस येथे पायी निघालेल्या राहुल गांधींना यूपी पोलिसांकडून अटक

Rohan_P

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाड दौऱ्यावर; दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार

Rohan_P
error: Content is protected !!