तरुण भारत

मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये मूक आंदोलन: संभाजीराजे कार्यकर्त्यांवर संतापले

खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे आंदोलन

नांदेड/प्रतिनिधी

Advertisements

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यांनतर मराठा समाज आक्रमक झाला. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आंदोलन सुरु झालं. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी १६ जून रोजी कोल्हापुरात भर पावसात मूक आंदोलन झालं होतं. . खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळी हे आंदोलन झालं. यावेळी राज्यभरातील आंदोलनकर्ते उपस्थित होते. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मूक आंदोलनाला सुरुवात होत आहे. नांदेडमधून सुरु होणाऱ्या या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहून संभाजीराजे त्यांच्यावर संतापले आहेत. यावेळी तात्यांनी मी जाऊ का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केलं. त्याचबरोबर कोरोना परिस्थितीची जाणिवही त्यांनी उपस्थितांना करून दिली.

यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी, कार्यकर्त्यांना कोरोना परिस्थितीची जाणीव करून दिली. सध्या कोविडची परिस्थिती पाहता आपण एवढी गर्दी करणं खरं चुकीचं आहे. पण मी तुमच्या भावना समजू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, तुमच्याकडे मास्क असेल तर तो लावावा. नांदेडला कोरोनाचं प्रमाण कमी असलं तरी तुम्ही खबरदारी घेणं गरजेचं आहे. ते बोलत असतानाच कार्यकर्ते गोंधळ करत होते, घोषणा देत होते. त्यामुळे “ओ बंद करा ना, कोणी बोलू नका’ असं म्हणत संभाजीराजेंनी कार्यकर्त्यांना खडसावलं.

Related Stories

एनसीबीच्या रडावर 50 सेलिब्रेटिज

Patil_p

राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार?

datta jadhav

आंध्र प्रदेश : हैदराबादमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!

Rohan_P

लालबागच्या राजाचा यंदा आरोग्योत्सव!

Rohan_P

नालासोपाऱ्यात 11 वर्ष जुनी इमारत कोसळली

Rohan_P

महाराष्ट्रात 2608 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav
error: Content is protected !!