तरुण भारत

महेंद्रसिंह धोनीचा ‘किलर’ लूक पाहिला का?


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी नेहमीच्या त्याच्या लूकमुळे चर्चेत असतो. करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात धोनी त्याच्या लांब केसांमुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी धोनीच्या हेअरस्टाईलची तरूणांना चांगलीच भूरळ पडली होती. आज देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याची ‘क्रेझ’ कमी झालेली नाही. तो नेहमीच लूकच्या बाबतीत नवनवीन प्रयोग करत असतो. अता देखील त्याचा असाच एक नवाकोरा एकदम ‘किलर’ लूक समोर आला आहे. सोशल मीडियावर त्याच्या या ‘किलर’ लूकची चांगलीच चर्चा रंगली आहे.

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने गुरुवारी धोनीचा एक नवीन फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो एकदम झक्कास दिसत आहे. .फोटो शेअर करत स्टार स्पोर्ट्सने लिहिले, ”एमएस धोनी आयपीएलपूर्वी नवीन आहे. खऱ्या पिक्चरसाठी आमच्याबरोबर राहा.”, यासोबतच त्यांनी ##AsliPictureAbhiBaakiHai हा हॅशटॅग देखील दिला आहे. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीसाठी महेंद्रसिंह धोनीचा नवीन लूक असल्याची चर्चा रंगली आहे. बहुतेक त्यांना हेच सांगायचे आहे हा फक्त नवीन लूक आहे खरा पिक्चर अजून बाकी आहे त्यामुळे खऱ्या पिक्चरसाछी असेच आमच्यासोबर रहा. जांभळ्या रंगाचे जॅकेट आणि गोल्डन रंगाचे केस हा धोनीचा न्यू लूक नेटकऱ्यांना मात्र भलताच आवडलेला दिसत आहे.


आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होईल.धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचे भारतीय खेळाडू यूएईला पोहोचले आहेत. सीएसके टीम दुबईत प्रशिक्षण घेईल. क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर खेळाडूंना सराव करण्याची उत्तम संधी असेल. सुरेश रैना, कर्ण शर्मा, ऋतुराज गायकवाड, दीपक चहर आणि अंबाती रायुडू हे खेळाडू दुबईला पोहोचले आहेत.

Advertisements

Related Stories

यू-17 महिला विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी भारतात

Patil_p

केरळमधील लॉकडाऊनमध्ये 23 मे पर्यंत वाढ; मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची घोषणा

Rohan_P

टीम साऊदी, सोफी डिव्हाइन यांचा गौरव

Patil_p

… तर होणार कठोर कारवाई : गृहमंत्री

prashant_c

जोकोव्हिचकडून बेलकेन टेनिस स्पर्धेची घोषणा

Patil_p

गुरमीत राम रहीमची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल; उपचारानंतर पुन्हा जेलमध्ये रवानगी

Rohan_P
error: Content is protected !!