तरुण भारत

वाहतुकीच्या नव्या नियमांसंदर्भात अधिसूचना जारी

ऑनलाईन टीम / मुंबई :

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुधारित मोटर वाहन अधिनियम 1989 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक देखरेख आणि रस्ता सुरक्षेच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार राज्य सरकारला वाहतूक नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित गुह्याची 15 दिवसांच्या आत संबंधिताला नोटीस पाठवावी लागेल. चलन जारी करण्यासाठी पोलिसांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करावा लागेल. तसेच ते चलन निकाली निघेपर्यंत इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ठेवावे लागणार आहेत.

Advertisements

वाहतूक नियमांचे पालन करणारी सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांच्या उच्च-जोखीम रस्त्यांवर आणि शहरात चौकाचौकांमध्ये स्थापित केली जातील. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्पीड कॅप्चर कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीड गन, मोटर डॅशबोर्ड कॅमेरे, नंबर प्लेट ओळख यंत्रे आणि वजन यंत्रे यांचा समावेश असेल.

या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आधारे गोळा केलेले चलन संबंधितास पंधरा दिवसांच्या आत पाठवावे लागेल. तसेच ते चलन निकाली निघेपर्यंत ते इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पोलिसांना ठेवावे लागेल.

Related Stories

पंजाब विधानसभेत कृषी कायद्यांविरोधात विधेयके

Patil_p

”मराठा समाजाला केंद्राने आरक्षण मिळवून द्यावे”

Abhijeet Shinde

‘भारत बंद’ला वाढता पाठिंबा

Patil_p

आग्रा : तानाजीनगर तीन दिवस पूर्ण बंद; विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर होणार कारवाई

Rohan_P

देशात 16,738 नवीन कोरोनाबाधित; 138 मृत्यू

Rohan_P

म्युकरमायकोसिस : 18 राज्यात 5424 रुग्ण

datta jadhav
error: Content is protected !!