तरुण भारत

‘सोमय्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले’, दगडफेकीच्या आरोपावर भावना गवळींची प्रतिक्रिया

वाशिम/प्रतिक्रिया

भाजप नेते किरीट सोमय्या वाशिम दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक करत शाई फेकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान गुरुवारी सोमय्या यांनी ट्विटरवरुन आपण २० ऑगस्ट रोजी शिवसेना खासदार भावना गवळी आणि समूहाचा १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड करण्यासाठी तसेच या प्रकरणाचा पाठपुरवठा करण्यासाठी वाशिमला जाणार असल्याचं जाहीर केलं होत.

नियोजनाप्रमाणे ते आज वाशिमला जाताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचं सोमय्या यांचं म्हणणं आहे. सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक करत शाई फेकली आहे. दरम्यान, यासर्व प्रकारांनतर शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले, आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी म्हणूनच दगडफेक झाली असावी, असं भावना गवळी म्हणाल्या.

दरम्यान, सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळी आणि समूहामध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच त्यांनी गुरुवारी आपण २० ऑगस्ट रोजी शिवसेना खासदार भावना गवळी आणि समूहाचा १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड करण्यासाठी तसेच या प्रकरणाचा पाठपुरवठा करण्यासाठी वाशिमला जाणार असल्याचं ट्विट केलं होत.सोमय्या वाशिमला शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची आज किरीट सोमय्या पाहणी करण्याकरिता आले होते. मात्र भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगड फेक आणि शाई फेक केली.

याविषयी खासदार भावना गवळी यांना विचारले असता त्यांनी पार्टीकल बोर्ड कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. शिवाय पोलिसांनी कारखान्यावर जाऊ नका, असे सांगूनही ते गेले, त्यामुळं शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक झाले. त्याचमुळे दगड फेक झाली असावी, असं भावना गवळी म्हणाल्या.

Advertisements

Related Stories

दहावीचा निकाल जून अखेरपर्यंत जाहीर होणार : वर्षा गायकवाड

Rohan_P

हेमंत बिस्वा शर्मा थोड्याच वेळात घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

datta jadhav

मध्य प्रदेशात दोन दिवसांचा कडक लॉकडाऊन!

Rohan_P

विटा, आष्टा आणि पलूस नगरपालिकेत प्रशासकराज

Abhijeet Shinde

“मराठा इतिहास रचतो,” नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन

Abhijeet Shinde

अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये अखेर जळगावला रवाना हंगामी अधिष्‍ठातापदी डॉ. आरती घोरपडे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!