तरुण भारत

सर्वधर्म समभावाचे प्रतिक मोहरम ताजीया उत्सव मालवणात साजरा

मालवण/ प्रतिनिधी-

सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून ओळखला जाणारा ऐतिहासिक मोहरम ताजीया उत्सव शुक्रवारी मालवणात प्रथेप्रमाणे साजरा होत आहे. किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवण वासीयांच्या ऐक्याचे प्रतिक ‘मोहरम ताजियाकडे’ शिवकालीन उत्सव म्हणूनही पाहिले जाते.

Advertisements

किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याजवळ किल्ल्याच्या रक्षणासाठी असलेले किल्लेदार मुस्लिम बांधव यांच्यासाठी सर्वधर्म समभावाचे प्रतिक असणारा मोहरमताजिया उत्सव छत्रपती शिवरायांपासून ३५० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून मालवणात हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने साजरा होत आहे.

पाच पवित्र आत्म्यांचे (पंज्जे) प्रतिक म्हजेच ताबूत मानले जाते.

शुक्रवारी दुपारी किल्ले सिंधुदुर्ग येथील मुस्लिम हिंदू बांधव एकत्र येत छत्रपती शिवराजेश्वर मंदिरात ताबूत आणण्यात आले. यावेळी शिवराजेश्वर मंदिरात फातीय (प्रार्थना) करण्यात आली. यानंतर शिवराजेश्वर मंदिरा सभोवताली ताबूत मिरवणूक झाल्यानंतर होडीच्या सहाय्याने मालवण मेढा येथे पिराची भाटी याठिकाणी आणण्यात आली. याठिकाणी आणखी एक ताबूत सजवून होता.

दरवर्षी मालवण मेढा येथून बाजारपेठ भरड मार्गे फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोट अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. यावर्षी कोरोना खबरदारीचे नियम पाळून उत्सव साजरा होत आहे. भाविक दर्शन घेत आहेत.

मुस्लिम, हिंदू बांधव एकत्र येत मुजावर बांधवांच्या वतीने साजरा होणारा हा ऐतिहासिक उत्सव लक्षवेधी असाच आहे.

Related Stories

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी विनापास येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवेश नाही

Abhijeet Shinde

रत्नागिरी : १८ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर ; एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

खरे-ढेरे-भोसले’च्या एनएसएस विद्यार्थ्यांची गरजुंना मदत

Patil_p

वजराट शाळा नं.१ येथे बोअरवेलचा शुभारंभ

Ganeshprasad Gogate

ड्रग्जच्या नशेत परदेशी पर्यटक सावंतवाडीत ताब्यात

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : प्रेक्षकाविना चित्रपटगृहे ओस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!