तरुण भारत

नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारे उपकरण

महापूर, अतिवृष्टी, ढगफुटी इत्यादी नैसर्गिक आपदांमध्ये अनेक माणसांचा बुडून मृत्यू होतो. कित्येकदा बुडालेल्या माणसांचा लवकर शोध लागत नाही. ही माणसे नेमकी कुठे बुडाली आहेत? हे समजू शकत नाही. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी वेळेवर प्रयत्न करणे अशक्मय होते. मात्र, आता ही समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे. बुडालेल्या लोकांचा दोन मिनिटात शोध लावणारे उपकरण निर्माण करण्यात आले आहे. ‘व्हिक्टिम लोकेटिंग कॅमेरा’ असे या उपकरणाचे नाव असून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने या उपकरणाचा समावेश आपल्या साधनासामग्रीत केला आहे. या उपकरणामुळे शेकडो लोकांचे जीव वेळेवर त्यांना बाहेर काढल्यामुळे वाचणार आहेत.

या उपकरणाची निर्मिती भारतातच करण्यात आली आहे. पाण्याच्या जवळ हे उपकरण नेल्यास पाण्याच्या तळापर्यंत जे काही आहे, ते दिसू शकते. पाण्यात माणूस बुडालेला असेल तर त्याचे नेमके स्थान काही क्षणात कळू शकते. त्यानुसार त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. वेळेवर त्याला पाण्याबाहेर काढल्यास वैद्यकीय उपचार करून त्याचा जीव वाचविला जाऊ शकतो. उत्तर प्रदेशातील पुरात या उपकरणाने बरेच साहाय्य केलेले आहे. त्याचा उपयोग अतिशय सुलभरीतीने करता येत असल्याने फारशा प्रशिक्षणाची आवश्यकता नसते. नदीमध्ये बोटीतून हे उपकरण नेता येते. माणूस बुडालेला असल्यास तो या उपकरणाच्या स्क्रिनवर दिसू शकतो. तसेच तो किती खोल बुडालेला आहे आणि नेमक्या कोणत्या ठिकाणी बुडालेला आहे, हे देखील दिसू शकते. हे उपकरण फार मोठे वरदान आहे, असे आपत्ती निवारण दलाचे म्हणणे आहे.

Advertisements

Related Stories

किरकोळ महागाई दर 2 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर

Patil_p

राफेलच्या सामर्थ्यात होणार वाढ

Patil_p

गरिबांच्या खात्यात 16 हजार 394 कोटी जमा

datta jadhav

विमानतळावर बॉम्ब ठेवणाऱया आरोपीची शरणागती

Patil_p

शेतकऱयांचे मन वळवण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न

Patil_p

केरळमधील प्रसिद्ध संत केशवानंद भारतींचे निधन

Patil_p
error: Content is protected !!