तरुण भारत

रस्ता गटारी बांधकाम अपूर्णावस्थेत

प्रतिनिधी/ बेळगाव

  येथील ओल्ड पी बी रोडवरील अयोध्या नगरमधील एक्साईज ऑफीससमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. डेनेज ब्लॉक झाल्याने या ठिकाणी खोदाई करण्यात आली. गटारीचे बांधकाम देखील सुरू आहे. अद्यापही चेंबरचे काम पूर्ण न झाल्याने तसेच रस्त्यापेक्षा गटारीची उंची वाढविण्यात आल्याने या ठिकाणाहून जाणे कठीण बनले आहे. त्यामुळे येथील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. वाहनधारकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisements

  या भागात अनेक हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहनधारकांची नेहमी वर्दळ असते. येथील काम अपूर्णावस्थेत असल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. याचा फटका रूग्णांना बसत असून ऍम्ब्युलन्स चालकालादेखील दुसऱया बाजूने जावे लागत आहे. तसेच सर्व वाहने वळसा घेऊन दुसऱया मार्गाने जात असल्याने वाहनधारकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सदर परिस्थिती गेल्या 15 दिवसांपासून तशीच असून वाहनधारकांची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळत आहे.

  कब्रीस्थान गेट नं.5 च्या शेजारी नागरीवस्ती आहे. या वस्तीसमोरील रस्ता  अरूंद असल्याने केवळ दुचाकी जाऊ शकते. मात्र एक्साईज ऑफीससमोरील रस्ता बंद असल्याने चारचाकी वाहनेदेखील येथून जात असून ती अडकून बसत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. चिखलाच्या समस्येलादेखील तोंड द्यावे लागत आहे. रहिवाशांना घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. अपूर्णावस्थेत ठेवण्यात आलेली कामे त्वरीत हाती घेऊन बंद करण्यात आलेला रस्ता वाहतुकीस लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

दुसऱया टप्प्यात दुसऱया दिवशी 364 अर्ज दाखल

Patil_p

पुन्हा डौलाने फडकू लागला सर्वात उंच तिरंगा

Patil_p

खानापूर तालुक्यात ग्रा. पं. निवडणुकीचे अंतिम चित्र आज स्पष्ट होणार

Patil_p

वळिवाने माळरानावरील कामांना सुरुवात

Patil_p

सियाचीन ऑक्सिजन प्लांटबाबत सुमेधा चिथडे यांचे व्याख्यान

Amit Kulkarni

शहापूर मंगाई देवीचा वाढदिवस सोहळा साजरा

Patil_p
error: Content is protected !!