तरुण भारत

कर्नाटकमध्ये १,६४८ रुग्ण कोरोनामुक्त, तर २४ तासात १८ मृत्यू

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत दररोज कमी जास्त होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासात राज्यात १,३५० नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. याचवेळी राज्याच्या विविध जिल्ह्यातून १,६४८ रुग्ण कोरोनावर मात करत करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर १८ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात अजूनही बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे जास्त रुग्ण सापडत आहेत. शनिवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात २६० पॉझिटिव्ह रुग्ण नोंदवले असून ३७४ रुग्ण डिस्चार्ज घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासामध्ये १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

Related Stories

कर्नाटकः मुख्यमंत्री बोम्माई आज पंतप्रधान मोदींना भेटणार

Abhijeet Shinde

कर्नाटक: एसआरटीसी कर्मचारी नाराज

Abhijeet Shinde

कर्नाटकात शुक्रवारी १ हजार ६३१ रुग्ण कोरोनामुक्त, तर ३४ मृत्यू

Abhijeet Shinde

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

१२० दिवसांच्या पेरणीसाठी पाणीपुरवठा होईल

Abhijeet Shinde

हिंसाचाराला सरकारचे अपयश जबाबदार : सिद्धरामय्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!