तरुण भारत

मोफत ‘मोदी’ एक्सप्रेस

ऑनलाईन टीम / मुंबई :

मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोकणात बस धावणार आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी मोफत ‘मोदी’ एक्सप्रेसची घोषणा आमदार नितेश राणेंनी केली आहे.

Advertisements

नितेश राणे यांनी म्हटले आहे की, दरवर्षी गणेशोत्सवावेळी कोकणवासीयांसाठी आपल्याकडून बसेस सोडण्यात येतात. यंदा बसेसऐवजी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देऊन नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला आहे; त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी ट्रेन सोडत आहोत. ‘मोदी एक्सप्रेस’ या नावाने ही ट्रेन दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर 8 वरून सुटेल. प्रवासादरम्यान, कोकणवासीयांना 1 वेळचे जेवणही देण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये 1800 नागरिक प्रवास करु शकतात. हा प्रवास मोफत असून, 27 ऑगस्टपर्यंत सबंधितांना फोन करून आपली सीट आरक्षित करावी लागणार आहे. दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडी येथे ही ट्रेन धावणार आहे.

Related Stories

निवडणुकांची घोषणा होताच ईडी अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती

Sumit Tambekar

सक्षम कारणावरच गोव्यात प्रवेश

NIKHIL_N

जिल्हय़ात अफवांचा ‘कोरोना’ व्हायरस

Patil_p

शेअर बाजारात मोठी घसरण

Patil_p

प्रशासकीय यंत्रणेकडून रत्नागिरी शहर सील

Abhijeet Shinde

जिल्हय़ात कोरोनाची संख्या साडेतीनशे पार

Patil_p
error: Content is protected !!