तरुण भारत

सांगली : जाधवनगर येथे धारदार शस्त्राने वार करत दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न

कुंडल / वार्ताहर

जाधवनगर ता. खानापूर येथे शेताच्या बांधावरुन मानसिंग नामदेव जाधव वय ५५ यांच्यासह मुलगा यांना कुकरीसारख्या धारदार शस्त्राने डोक्यात वार करुन जीवे मारणेचा प्रयत्न तर कुटूंबातील इतरांना लाथाबुक्यानी मारहाण करुन जखमी केलेची फीर्याद मानसिंग नामदेव जाधव यांनी कुंडल पोलीसात दिली असून जखमींना उपचारासाठी हॉस्पीटल येथे दाखल केले आहे.

याबाबत कुंडल पोलीसातुन मिळालेली माहिती अशी की दि. १८ रोजी आरोपी अनंत बाळासो जाधव, अनिल उर्फ बाळासो गोविंद जाधव, औंकार अनंत जाधव , अनिकेत अनंत जाधव, वैभव उर्फ दिगु अनिल जाधव सर्व रा. बलवडी ता. खानापुर यांनी जाधवनगर येथील फिर्यादीच्या घराजवळ येऊन तु शेताच्या बांधाचा वाद मिटण्यापूर्वीच शेतात का रोटर मारलास असा जाब विचारुन शिविगाळ करु लागले असता फिर्यादी मानसिंग जाधव व त्यांची पत्नी व मुले हे समजावून सांगत असतानाच अनंत बाळासो जाधव याने मानसिंग जाधव यांना पाठीमागून पकडले व औंकार अनंत जाधव याने तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणत व शिवीगाळ करत हातातील कुकरीने डोक्यात वार केला.

त्यानंतर अनंत जाधव व ओंकार जाधव यांनी खाली पाडून लाथाबुक्याने मारण्यास सुरुवात केली असता प्रणव मानसिंग जाधव मध्ये आला असता अनिकेत जाधव याने त्यालाही पाठीमागुन घट्ट पकडले व वैभव जाधव याने तुलाही जिवंत ठेवत नाही असे म्हणत हातातील गुप्तीने त्याच्या डोक्यात वार करुन जखमी केले. त्यानंतर फिर्यादीची पत्नी,मंदा सुन रोहिणी व प्रतिक हे सोडविण्यासाठी मध्ये आले असता त्यांनाही सर्व आरोपींनी लाथाबुक्यानी मारहाण करुन जिवे मारणेची धमकी दिली असून वरील सर्व आरोपींच्या विरोधात कलम ३०७,१४३, १४७, १४८,१४९,३२३,५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंद केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. अधिक तपास कुंडल पोलीस करत असून डी.वाय.एस.पी. अश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पहाणी केली व तपासाबाबत सुचना केल्या.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस 2 जुलै पासून धावणार

triratna

सांगली : ‘त्या’ युवतीच्या भावासह 12 निगेटिव्ह

triratna

महिला, अपंग, आजारी शिक्षकांना निवडणूक कामातून वगळा

triratna

सांगली जिल्ह्यात एप्रिल ते जुलै मध्ये ‘जीएसटी’ समाधान कारक

triratna

साईदत्त को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत

triratna

यशवंत साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणार : खासदार संजयकाका पाटील

triratna
error: Content is protected !!