तरुण भारत

‘बाप बीप’मधून सुटणार वडील-मुलाच्या नात्यातील गुंता

वडील-मुलाचे नाते हे नेहमीच तणावपूर्ण आणि संवेदनशील राहिले आहे. मुलाची आईसोबत जितकी जवळीक, मैत्रीपूर्ण नाते असते, तितकीच भीती, दरारा वडिलांबाबत असतो. एकमेकांमध्ये सुसंवाद नसतो, अनेकदा एकमेकांविषयी प्रेम असूनही ते व्यक्त करण्यासाठी दोघेही संकोच करतात. अशाने त्यांच्या नात्यातील दरी अधिकच खोल होत जाते. अशा या गुंतागुंतीच्या नात्यावर भाष्य करणारी ‘बाप बीप बाप’ वेबसीरिज भेटीला येत आहे. या वेबसीरिजमध्ये शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, पर्ण पेठे, तेजस बर्वे, उदय नेने हे मुख्य भूमिकेत आहेत.

लॉकडाऊन आधी कधीच एकत्र वेळ न घालवलेल्या वडील-मुलाला जेव्हा लॉकडाऊनमुळे नाईलाजास्तव एकमेकांबरोबर वेळ घालवावा लागतो तेव्हा नक्की काय होते? या काळात नात्यातील संवाद गवसतो का? त्यांच्या नात्याचा हा गुंता सुटतो का? या सगळय़ा प्रश्नांची उत्तरे ‘बाप बीप बाप’मध्ये मिळणार आहेत. अमित कान्हेरे यांनी हा विषय अतिशय छान पद्धतीने हाताळला आहे. थोडेसे अबोल, संकोच असलेले हे नाते उगीचच गंभीर न करता अतिशय गोड आणि हलक्या फुलक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडले आहे. व्यस्त असलेली नाती कोरोनाकाळात उमलली व बहरलीसुद्धा. कुटुंबाने एकत्र वेळ घालवला. यात अनेक नाती घट्ट झाली.  वडील-मुलाचे संवेदनशील नाते ‘बाप बीप बाप’ या वेबसीरिजमध्ये अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

बाप्पासाठी स्वरूप – वैशालीची ऍकापेला आराधना

Patil_p

देसी गर्लचे निकसोबत लक्ष्मीपूजन

Patil_p

‘मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा प्रदर्शनाचा मुहूर्त जाहीर

Patil_p

खऱया आयुष्यात मला कुमार व्हायचं नाही

Patil_p

मास्टरशेफ तेलगूवर कारवाई करणार तमन्ना

Patil_p

‘दख्खनचा राजा’ मालिकेत स्थानिक कलाकारांना रोजगाराची संधी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!