तरुण भारत

‘हिंग पुस्तक तलवार’चा हास्यकल्लोळ आता जगभर

‘हिंग पुस्तक तलवार’ ही प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणारी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाव ऐकूनच थोडे विचारात पडलात ना? काय आहे हे नक्की? या वेबसिरीजचे नावच इतके अफलातून आहे. त्यामुळे यात नक्की काय पहायला मिळणार याविषयी सर्वांच्याच मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. जशी हाताची पाचही बोटे सारखी नसतात, तशीच मित्रपरिवारातील सर्वांचेच व्यक्तिमत्वही सारखे नसते. अशाच वेगवेगळय़ा पार्श्वभूमीचा मित्रपरिवार एकत्र येऊन प्रेक्षकांना लोटपोट हसवणार आहे. नुकताच सोशल मीडियावर ‘हिंग पुस्तक तलवार’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. ही वेबसिरीज बघताना तुम्हाला तुमच्या मित्रपरिवाराची नक्कीच आठवण येईल.

मित्रांच्या ग्रुपमध्ये प्रत्येकाची अशी एक विशेष ओळख असते. सर्वांचेच स्वभाव काही सारखे नसतात. या वेबसिरीजमध्येही तशाच काही भन्नाट व्यक्तिरेखा आहेत. कॉर्पोरेटच्या कटकटीला कंटाळलेला ‘अक्षय’ तर गर्लप्रेंड आणि बॉसमध्ये अडकलेला ‘अमित’, साधी भोळी आणि इनोसन्ट अशी ‘अमृता’, दुसऱयांची लग्न  जुळवणारा पण स्वतःच्या गर्लप्रेंडला प्रत्येक मुलीत शोधणारा ‘समर’ तसेच मित्रांमध्ये बडबड करणारा परंतु इतरांसमोर शांत असणारा ‘कौस्तुभ’, खूपच प्रॅक्टिकल असणारी ‘सानिका’ आणि प्रत्येकाच्या प्रॉब्लेमचे वन स्टॉप सोल्यूशन देणारा ‘पांडे’. आता हे भिन्न स्वभावाचे सर्वजण जेव्हा एकत्र येतील तेव्हा काय धम्माल उडेल, हे प्रेक्षकांना 31 ऑगस्टपासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर पहायला मिळेल. ओमकार रेगे आणि तन्मय कानिटकर यांनी ही वेबसिरीज लिहिली असून यात अक्षयची भूमिका शौनक चांदोरकर, अमितची भूमिका सुशांत घाडगे, अमृताची भूमिका केतकी कुलकर्णी, समरची भूमिका क्षितिश दाते, कौस्तुभची भूमिका नील सालेकर, सानिकाची भूमिका मानसी भवाळकर आणि पांडेची भूमिका अलोक राजवाडे यांनी साकारली आहे.

Advertisements

Related Stories

चर्चा ‘फरहान-शिबानीच्या’ लग्नाची…………

Abhijeet Shinde

वाढदिवस कुटुंबासोबत साजरा करते रविना

Patil_p

लॉकडाऊनमध्ये संतोषने पिकवला हशा

Patil_p

अनुष्का शेट्टी आता ‘कू’वर

Amit Kulkarni

दुबईत साजरा होणार ‘गल्फ सिने फेस्ट’

Omkar B

उपेंद्र लिमये झाले गायक संगीतकार

Patil_p
error: Content is protected !!