तरुण भारत

मडगाव नगरपालिकेचे दयनीय वाहन व्यवस्थापन पुन्हा उघड

पाच वर्षांपूर्वी मिळालेल्या 7 रिक्षा गॅरेजमध्ये पडून

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

मडगाव पालिकेच्या दयनीय वाहन व्यवस्थापनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून 2016 मध्ये मिळालेल्या 7 रिक्षा वापराविना जुन्या बाजारपेठेतील पालिकेच्या गॅरेजमध्ये गंजत पडून आहेत. या 7 रिक्षा जून, 2016 मध्ये देण्यात आल्या होत्या. कचरा संकलन सुलभ करण्यासाठी त्या उपयोगात आणणे आवश्यक होते. विशेषतः अरूंद आणि खराब भागांत त्यांचा वापर उपयुक्त होईल हा त्यामागील हेतू होता. 

तथापि, डिसेंबर, 2016 पर्यंत ही वाहने कधीही वापरात आणली गेली नाहीत.  सार्वजनिक निधीचा अशा प्रकारे अपव्यय होत असल्याचे आढळून आल्याने शॅडो कौन्सिलने त्यावेळी आवाज उठविला होता, असे त्याचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी नजरेस आणून दिले. दरम्यान, पालिकेमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या सर्व रिक्षा बॅटरीत बिघाड झाल्याने निष्क्रिय बनल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. कुतिन्हो यांनी आपण या स्पष्टीकरणावर समाधानी नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, सर्व 7 वाहनांच्या बॅटऱयांत एकाच वेळी कसा बिघाड झाला.

पालिकेच्या वाहनांच्या देखभालीसाठी ऑटोमोबाईल इंजिनिअरसह अर्धा डझन कामगार गॅरेजमध्ये कार्यरत असूनही गॅरेजमधील चित्र चांगले दिसत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही तेथील मॅकेनिकबद्दल काही गमतीशीर गोष्टी ऐकत आलो आहेत. मॅकेनिक वाहनांच्या दुरुस्तीदरम्यान गॅरेजमध्ये आपल्या हाताला डाग लागणार नाही याचीच जास्त काळजी घेत असतो असे आढळून आले आहे. कारण बहुतेक वेळा वाहने खासगी मॅकेनिककडे दुरुस्तीसाठी पाठविली जात असतात, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे. पालिकेने वाहनांच्या देखभालीकडे योग्य लक्ष द्यावे. कारण वारंवार वाहने नादुरुस्त होण्यातून केवळ पालिकेला आर्थिक फटकाच बसत नाही, तर यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाला बाधा येते. पालिकेच्या वाहने हाताळणाऱया विभागाने प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र फायली ठेवाव्यात, अशी सूचना शॅडो कौन्सिलकडून करण्यात आली आहे. कार्यान्वयन आणि देखभालीच्या संदर्भात कोणते वाहन पांढरा हत्ती बनले आहे हे त्यामुळे समजेल, असे कुतिन्हो यांनी नजरेस आणून दिले आहे.

Related Stories

नीती आयोगाकडून राज्याला 300 कोटी रूपये मंजूर

Amit Kulkarni

केजी ते पीजीपर्यंत शिक्षण देण्यास हरमल पंचक्रोशी समर्थ

Amit Kulkarni

कुडचडे परिसराला पावसाने झोडपले

Amit Kulkarni

कोकण रेल्वेच्या बबन घाटगेंवर भ्रष्टाचाराचा आरोप

Omkar B

कोरोनावर ‘जैत’साठी कोकणी कलाकार आले एकत्र

Omkar B

राज्यात पावसाची शक्यता

Patil_p
error: Content is protected !!