तरुण भारत

संघटितपणे कार्य केल्यास साखळी जिंकणे सोपे

राज्यातील महिला सुरक्षित नाही. खाणींविषयी सरकार अपयशी, दोष मात्र आम्हाला. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची टिका

डिचोली/प्रतिनिधी

Advertisements

  साखळी मतदारसंघात काँग्रेस पक्षाची चांगली शक्ती आहे. या मतादरसंघात सर्व नेते आणि कार्यकर्ते संघटीत राहून कार्य केल्यास हा मतदारसंघ जिं?कणे कठीण नाही. 2009 साली या मतदारसंघात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत आपच मुख्यमंत्री या नात्याने तळ ठोकत प्रत्येक घराघरांत प्रचार केला होता. आणि सर्वांनी संघटितपणे कार्य करून काँग्रेसचा आमदार निवडून आणला होता. त्याचप्रकारचे कार्य आज झाल्यास या मतदारसंघात विजय मिळविणे सोपे आहे. विद्यमान सरकार हे केंद्राच्या इशाऱयांवर नाचत राज्यातील लोकंवर प्रदुषणकारी व राज्याच्या पर्यावरणाचा विध्व?स करणारे प्रकल्प लादण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. काँग्रेस सरकार आल्यास हे प्रकल्प रद्द करणार, अशी घोषणा विरोधी पक्षनेते आमदार दिगंबर कामत यांनी कुडणे साखळी येथे केली.

   कुडणे साखळी येथे काँग्रेस पक्षाचे नेते महादेव खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली खोलण्यात आलेल्या काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रवक्ता ट्रोजन डिमेलो, युवा अध्यक्ष वरध म्हार्दोळकर, साखळीचे उपनगराध्यक्ष राजेश सावळ, महादेव खांडेकर, निळकंठ गावस, महिला अध्यक्षा झरीन शेख खान, साईश आरोंदेकर, प्रदीप मळीक आदीची उपस्थिती होती.

  आज राज्यात महिला सुरक्षित नसून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. कोवीडच्या दुसऱया लाटेवेळी परिस्थिती हाताळण्यात हे सरकार सर्वतोपरी अपयशी ठरले आहे. ऑक्सजिनच्या अभावामुळे लोकां?ना आपले प्राण गमवावे लागले. यास सरकार जबाबदार असून कोवीडमुळे बळी गेलेल्या मृतांचे नातेवाईक आज सरकारच्या नावाने टाहो फोडत आहेत. याही परिस्थितीत सरकर आपल्याच धुंदीत आहे. म्हणूनच आज लोकांकडून हे सरकार आणून आम्ही चूक केली, अशी भाषा ऐकायला मिळत आहे. खाणींच्या विषयी हे सरकार अत्यंत फोल व उघडले पडले आहे. आपण मुख्यमंत्री असताना खाणींच्या माध्यमातून लहान मोठय़ा घटकांना कमविण्याची संधी दिली होती. कोणाच्या पोटावर मारला नव्हते. मात्र या सरकारने शहाणपणा दाखवत हजारोंच्या संख्येने पोटावर मारले आहे. आपण मुख्यमंत्री तथा खाणमंत्री असताना एकही ट्रक घेतला नाही, यंत्र घेतले नाही, माल वाहतूक केली नाही, बार्ज घेतली नाही. या सर्वांमध्ये कोण गुंतले आहेत हे सर्वांना माहित आहे. तरीही आज खाणींच्या विषयी आपले अपयश लपविण्यासाठी आपल्यावर दोषारोप ठेवले जातात. असेही यावेळी दिगंबर कामत यांनी सांगितले.

   गोवेकरांचे आज या सरकारने हाल.करून ठेवले आहेत. मुख्यमंत्र्यांनी लोकंवर हि परिस्थिती आणली आहे. लहान घटक देशोधडीला पोहोचले असून भाजप सरकार आल्यानंतर राज्यावरील कर्ज केवळ या मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक अव्यवस्थापनामुळे 7 हजार कोटीवरून 26 हजार कोटीवर पोहोचले आहे. अभ्यास न करता बोलणारा हा मुख्यमंत्री असून स्वतःचे अपयश इतरांच्या माथी मारण्याचे काम करीत आहे. खाणी कशा सुरू करायच्या त्याचा अभ्यास नाही, पण काँग्रेस व दिगंबर कामत यांच्यावर टिका करण्यात धन्यता मानत आहेत. राज्याला ड्रग्सचे केंद्र केले होते. हा त्यांचा कौटुंबिक धंदा झालेला आहे. आता बलात्काराचे केंद्र करून सोडले आहे. खनिज खाणींच्या 35 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे काय झाले, कोणाला अटक केली याचा हिशोब मुख्यमंत्र्यांनी द्यावा. प्रत्येक निवडणुकीत लोकांना नोकऱयांचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते. मात्र यावेळी लोक फसणार नाहीत, तर 2022 मध्ये काँग्रेसची सत्ता होणार आणि त्यात साखळीचा आमदार काँग्रेस असणार. असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले.

  यावेळी प्रास्ताविकपर भाषणात बोलताना महादेव खांडेकर यांनी म्हटले की, साखळी मतादरसंघात एक विशिष्ट उद्दिष्ट घेऊन सामाजिक एकत्रिकरण करण्यासाठी आम्ही सरसावले आहेत. काँग्रेस पक्षाचे कार्य खुप मोठे असून आज गोव्याची राजकीय वाटचाल याच पक्षाकडे केंद्रीत झालेली आहे.  काँग्रेस पक्ष एक योग्य माध्यम असल्याने तेच धोरण ठेऊन या पक्षात प्रवेश केला. आज सर्वच क्षेत्रात राज्य व देश देशोधडीला जात असल्याचे काँग्रेस सत्तेवर येणे काळाची गरज आहे. अन्यथा भविष्यातील दिवस कठीण असणार. येणाऱया चार महिन्यांनंतर या साखळी मतदारसंघातील वातावरण समजणार आणि लोकांना कळणार. या मतदारसंघात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता लोकांनी ठरविले असून येणारा काळ काँग्रेसच्या सत्तेचा आणि या मतदारसंघात काँग्रेसच्या विजयाचा निश्चित आहे.

  वरद म्हार्दोळकर यांनी भाजपला सत्तेपुढे लोकांचा विसर पडला आहे. गोवा आज अनेक समस्यांनी त्रस्त असून बेरोजगारी, महागाई व इतर विषयांमुळे लोक त्रस्त आहेत. काँग्रेसची सत्ता असताना जनता सुखी होती. लहान घटक सुखी संसार करीत होते. 2012 पासून राज्याची वाटचाल अधोगतीला पोहोचली असून हे चित्र आता 2022 मध्ये बदलायला हवे, असे म्हटले

  ट्रोजन डिमेलो यांनी, राज्यात हुकुमशाही व दडपशाहीचे सरकार चालत असून त्यांचे घरी जाण्याचे दिवस जवळ आले आहेत. योजनांच्या नावावर सामान्य लोकांचे पैसे काढून केवळ दहा टक्केच पैसे लोकांना देऊन फसवणूक चालवली आहे. जनता आता फसणार नाही. या वेळी गोव्यात भाजप एक क्रमांकी आमदारसंख्येवर आणून सोडणार. असे म्हटले.   निळकंठ गावस यां?नी यावेळी, साखळीत असलेल्या सर्व काँग्रेस नेत्यांनी एकत्रित राहून कार्य केल्यास या मतदारसंघात काँग्रेसचा विजय निश्चित आहे. असे म्हटले. समई प्रज्वलित करून व फित कापून कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. सूत्रसंचालन सुमन गावस यांनी केले, तर आभार सुदेश मळीक यांनी मानले.

Related Stories

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जीवरक्षकांचे आमरण उपोषण मागे

Omkar B

कोरोनासंदर्भात पोस्टर लाँच

Amit Kulkarni

कळंगूट शांतादुर्गा मंदिरातील सार्वजनिक गणपतीचे विसर्जन

Patil_p

सर्वच क्षेत्रात गोव्याला आत्मनिर्भर बनविण्याची प्रक्रिया सुरू

Patil_p

राजधानी पणजीसमोर धोक्याची घंटा

tarunbharat

कोरोनाची परिस्थिती जातेय हाताबाहेर

Amit Kulkarni
error: Content is protected !!