तरुण भारत

बेळगावमध्ये 27 ठिकाणी पार पडली टीईटी परीक्षा

बेळगाव / प्रतिनिधी

भावी शिक्षकांसाठी महत्त्वाची असणारी कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षा (के-टीईटी) रविवारी पार पडली. बेळगाव शहरात एकूण 27 परीक्षा केंदांवर परीक्षार्थींनी परीक्षा दिली. विकेंड कर्फ्यू असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागली. परीक्षेमुळे शहरातील महत्त्वाच्या शाळांसमोर परीक्षार्थी व त्यांच्या पालकांची गर्दी दिसून आली.

Advertisements

डीएड झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेवर रुजू होण्यासाठी टीईटी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. वर्षातून एकदा टीईटी परीक्षा घेतली जाते. पुढील काळात शिक्षक भरती होण्याची शक्मयता असल्यामुळे यावषी टीईटी परीक्षा देणाऱयांच्या संख्येत वाढ झाली. बेळगाव विभागात 27 परीक्षा केंद्रांवर 6 हजार 320 विद्यार्थी परीक्षा देणार होते.

सकाळी 9.30 ते दुपारी 12 या वेळेत पहिला पेपर पार पडला. दुपारी 2 ते 4.30 या वेळेत दुसरा पेपर पार पडला. कोरोनाच्या नियमावलीमुळे परीक्षेच्या कालावधीपूर्वी अर्धातास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर हजर राहावे लागले. केवळ पाण्याची बाटली आत नेण्यास परवानगी देण्यात आली होती. परीक्षा केंद्रात प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी केली जात होती.

Related Stories

देवदेवतांच्या भग्न प्रतिमांचे संकलन

Patil_p

कचरा विल्हेवारीसाठी प्रस्ताव सूचविण्याचे आवाहन

Omkar B

माधवबागची ‘हृदयरोग मुक्त कर्नाटक’ मोहीम आजपासून

Patil_p

उचगावमध्ये दिवसाढवळय़ा धाडसी चोरी

Amit Kulkarni

धामणे परिसरात भात पेरणीला प्रारंभ

Patil_p

टिळकवाडीतील भंगीबोळांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni
error: Content is protected !!